डॉ.पंजाबराव देशमुख यांची १२५ व्या जयंती निमित्त आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षाच्या अनुषंगाने मिलेट दौडचे आयोजन
बुलढाणा- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी- देशाचे पहिले कृषिमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांची १२५ व्या जयंतीनिमित्त आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३च्या अनुषंगाने मिलेट दौडचे आयोजन करण्यात आले होते.जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही दौड पार पडली.
जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी मनोजकुमार ढगे, आत्माचे प्रकल्प संचालक पुरुषोत्तम उन्हाळे सहयोगी प्राध्यापक डॉ. चंद्रकांत जायभाये, सहायक प्राध्यापक डॉ. दिनेश कानोडे, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचे श्री. ढवळे, कृषि उपसंचालक कु. एस. आर. कणखर, उपविभागीय कृषि अधिकारी डी. बी. सवडतकर, बाळासाहेब व्यवहारे, अंबादास मिसाळ उपस्थित होते.सध्याच्या जीवनशैलीत सर्वच वयोगटातील लोकांच्या विशेषतः विद्यार्थ्यांच्या आहारातील पौष्टिक तृणधान्य पदार्थांचा वापर कमी होत आहे. परिणामी आरोग्यविषयक समस्या वाढत आहेत. जिल्ह्यात पौष्टिक तृणधान्याच्या उत्पादनात वाढ करणे व लोकांमध्ये पौष्टिक तृणधान्यामधील गुणधर्माविषयी जागरूकता निर्माण करून दैनंदिन आहारात त्यांचा समावेश करण्यासाठी कृषी विभागामार्फत आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्त मिलेट दौड आयोजित केली होती.
कृषि विभागामार्फत विविध उपक्रम गावोगावी राबविण्यात येत असून, मिलेट दौड जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा सत्र न्यायालय, कारंजा चौक, भोंडे सहकार चौक, तहसील कार्यालय, संगम चौक, जिजामाता प्रेक्षागार ग्राउंड या मार्गाने काढण्यात आली. जिजामाता प्रेक्षागार ग्राउंड येथे मिलेट दौडचा समारोप करण्यात आला.जिल्ह्यातील सर्व तालुका कृषि अधिकारी व कृषि विभागातील अधिकारी व कर्मचारी वृंद उपस्थित होते. एडेड महाविद्यालय व ज्युनिअर कॉलेज, डॉ. राजेंद्र गोडे कृषि महाविद्यालय, श्री. शिवाजी ज्युनिअर कॉलेज व भारत विद्यालय येथील शिक्षक वृंद व विद्यार्थी सहभागी झाले होते.कार्यक्रमाचे नियोजन सुवर्णा आदक, मयुरी खलाणे जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी कार्यालयातील कर्मचारी वृंद यांनी केले आहे.