वरवंड येथील दिव्य सेवा प्रकल्प देतोय मनोरुग्णांना साथ !
साखरखेर्डा :आपलं बुलढाणा जिल्हा बातमी- दिव्या फाउंडेशन अंतर्गत दिव्यसेवा प्रकल्प वरवंड बुलढाणा हे नेहमी मनोरुग्ण, बेघर, वृद्धांना मदत करीत असते आतापर्यंत 1000 च्या जवळपास पूर्ण भारतभर त्यांनी मनोरुग्ण असो बेघर असो या सर्वांचे पुनर्वसन करून त्यांच्यावर उपचार करून जोपर्यंत मनोरुग्ण बरा होत नाही आणि स्वतः घरी जायचे म्हणत नाही तोपर्यंत ते काळजी घेतात. खरोखरच माणसातला देव ओळखण्याची गरज उरली आहे. तसेच पुरुषोत्तम मानतकर यांच्या माध्यमातून शारा (लोणार) येथील नेहा ढवळे हिला या प्रकल्पामध्ये दाखल केले ती सुद्धा थोड्या प्रमाणात मनोरुग्ण होती परंतु दिव्य सेवा प्रकल्पाचे अध्यक्ष अशोक भाऊ काकडे यांनी नेहाला अवघ्या 42 दिवसात आजारातून बरे केले. नेहाला शारा येथील घरी सोडण्यात आले. यावेळी दिव्या फाउंडेशनचे अध्यक्ष अशोकभाऊ काकडे, पुरुषोत्तम मानतकर (जिजामाता हायस्कूल), दर्शनकुमार गवई, विशाल ग्यारल, संदेश वानखेडे इत्यादी हजर होते