उसनवारीच्या पैशांच्या वादावरून पती पत्नीस केली मारहाण…
खामगाव : आपलं बुलढाणा जिल्हा बातमी- शहरालगतच्या जुनी वाडी येथे उसनवारीचे पैशातून वाद घालत पती-पत्नीस मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हे दाखल केले. तर परस्परविरोधी तक्रारीवरून दुसऱ्यावर गुन्हे दाखल करण्यात आले. ही घटना सोमवारी घडली.
याप्रकरणी दत्ता भास्कर जवंजाळ (३०) यांनी पोलिसात तक्रार दिली. त्यामध्ये सोमवारी दुपारी ५ वाजताच्या सुमारास नागेश मधुकर जवंजाळ (३३) याने वाद घालून शिवीगाळ केली. लोखंडी रॉडने मारहाण करून जखमी केले, जीवे मारण्याची धमकी दिली.
यावेळी त्यांची पत्नी मध्यस्थी करण्यासाठी आली असता तिही सुद्धा नागेश जवंजाळ याने लोटपाट केली. तसेच दुचाकीला दगड मारून नुकसान केल्याचे तक्रारीत म्हटले. याप्रकरणी शहर पोलिसांनी आरोपीविरुद्ध भादंवि कलम ३२४, ३२३, ५०४, ५०६, ४२७ नुसार गुन्हा दाखल केला. पुढील तपास एएसआय बळीराम वरखडे करीत आहेत. तर नागेश मधकर जवंजाळ
यांनीही तक्रार दिली. त्यामध्ये दुपारी ४.३० वाजताच्या सुमारास त्याची आई दत्ता भास्कर जवंजाळ याच्याकडे उसने दिलेले पैसे मागण्यासाठी गेली, त्याने पैसे नाहीत, असे म्हणून शिवीगाळ केली.
यावेळी मध्यस्थी करण्यासाठी गेला असता त्यांना कुन्हाडीचा दांडा व दगड मारून जखमी केले. तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याचे म्हटले. याप्रकरणी नागेश जवंजाळ यांच्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध भादंवि कलम ३२४, ३२३, ५०४, ५०६ नुसार गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोहेकॉ गजानन पाटील करीत आहेत.