लग्नाचे आमिष दाखवत महिलेवर केला त्या नराधमाने लैगिंक अत्याचार…
बुलढाणा शहर पोलिस स्टेशनला आरोपीविरूध्द गुन्हा दाखल
बुलढाणा : आपलं बुलढाणा जिल्हा बातमी- लग्नाचे आमिष दाखवत एका ४१ वर्षीय विवाहितेवर सातत्याने अत्याचार केल्याप्रकरणी बुलढाणा पोलिसांनी एकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपीने पीडित महिलेस तिचा व्हिडीओ समाजमाध्यमावर टाकण्याची धमकीही दिली होती.
पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, जिल्ह्यातील एका पतसंस्थेत कार्यरत असलेल्या महिलेसोबत हा प्रकार घडला आहे. पीडित महिला
घटस्फोटीत असून, दरम्यान, संकेत सुभाषचंद्र गावडे (३५, रा. बुलढाणा) असे आरोपीचे नाव आहे. २०१७ मध्ये पीडित महिलेची आरोपीसोबत ओळख झाली. त्यातून त्यांच्यात जवळीक निर्माण झाली. त्यातच आरोपीने नंतर पीडित महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याचे तक्रारीत नमुद आहे. हा प्रकार नंतर सातत्याने सुरू होता. दरम्यानच्या काळात त्यांच्या संबंधाची चित्रफीतही आरोपीने बनवल्याचे तक्रारीत आहे. जवळपास दोन वर्षांपासून हा प्रकार सुरू होता. दरम्यान, ८ जानेवारी रोजीही आरोपीने पीडितेला बाहेरगावहून बोलावत तिच्यासोबत संबंध प्रस्थापित केले होते. चित्रफीत समाजमाध्यमावर व्हायरल करण्याची धमकी आरोपीने तिला दिली होती. पीडितेने लग्नासाठी आरोपीसोबत आग्रह धरला असता आरोपीने त्यास नकार दिला. सोबतच तिला त्याने मारहाणही केल्याचे पिडित महिलेने तक्रारीत नमुद केल आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीस अटक केली.