बेरोजगारांना रोजगार व शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळावा यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय समोर राष्ट्रवादीचे डफडेबाजाव आंदोलन …
बुलढाणा :-आपलं बुलढाणा जिल्हा बातमी: राज्यातील बेरोजगारी व शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळावा याकरिता राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पार्टीचे प्रदेशाध्यक्ष महबूब शेख यांच्या यांच्या नेतृत्वाखाली आज दि १९ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करत डफडे बजाव आंदोलन करण्यात आले.
जिल्हाभरात अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान होऊन दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांवर आले.
जिल्ह्यात प्रामुख्याने कपाशी व सोयाबीन पिकाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते यावर्षी कपाशीचे भाव ६५०० सोयाबीनचे भाव ४ हजार हे मागील भावाच्या खूप कमी असून लागवडीला लागलेला खर्च सुद्धा या दरामध्ये निघत नसल्याने शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे.
तसेच सध्याचे सरकार खाजगीकरणाच्या धोरणावर चालणारी असून नवीन रोजगारांच्या संधी पूर्णपणे संपुष्टात आले आहे कंत्राटी पद्धतीने भरती करण्याचा डाव शासन करीत असून यामुळे युवकांना शाश्वत रोजगार मिळणे देखील कठीण झाले आहे.
नवीन 9 कंपन्यांना कंत्राटी भरतीचे कंत्राट देऊन सुशिक्षित बेरोजगारांची थट्टाच चालवल्याचे दिसून येत असल्याचा आरोप दिलेल्या निवेदनात करण्यात आला आहे.
बेरोजगारांना रोजगार मिळावा व शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळावा याकरिता आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश अध्यक्ष महबूब शेख यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करत डफडेबजाव आंदोलन करण्यात आले यानंतर जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनावर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पराग पाटील अवचार, कैलास जाधव संगीतराव भोंगळ डॉ ज्योती गाडेकर, नरेश शेळके, संगीतराव भोंगळ, डॉ रिजवान खान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे बुलढाणा शहराध्यक्ष अनिल बावस्कर वैभव पवार शेख समीर शेख इमरान शेख युसुफ शेख अंशू माऊली शहा रफिक शहा दानिश शेख आशिष पाणझोडे यांच्यासह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.