Homeबुलढाणा (घाटावर)

हर घर सविधान अभियान राबवा रिपब्लिकन सेनेची मागणी…

Spread the love

 चिखली: आपलं बुलढाणा जिल्‍हा बातमी-   हर घर संविधान अभियान राबविण्यात यावे अशी मागणी रिपब्लिकन सेनेच्या वतीने तहसीलदार यांना दि. 19 जानेवारी 2024 रोजी निवेदन देण्यात आले. स्वतंत्र्याचा अमृत महोउत्सव साजरा करताना हर घर तिरंगा अभियानाचा माध्यमातून राष्ट्र प्रेमाचा भावना करण्यासाठी प्रयत्न केले त्याच प्रमाणे भारतीय संविधानाचा अमृत महोत्सव निमित्त हर घर संविधान अभियान राबवावे यासाठी विशेष तरतूद शासनाने करावी विविधतेने नटलेल्या आपल्या देशात एकात्मता निर्माण करणाऱ्या भारतीय संविधानामुळे देश महासत्तेकडे मार्गक्रमण करीत आहे यंदा संविधानाचा अमृत महोत्सव असून हा शासनाने उत्साहात साजरा करावा हर घर संविधान अभियान शासनाने राबवावे प्रत्येक कार्यालयात संविधान प्रस्ताविका डिजिटल स्वरूपात लावावी सर्व कार्यालयाला विद्युत रोषणाई करावी सर्व शाळा कॉलेज शासकीय कार्यालय व निमशासकीय कार्यालयामध्ये डिजिटल सविधान प्रस्ताविका लावण्याचे आदेश देण्यात यावे तसेच बुलढाणा जिल्ह्यातील प्रत्यक शहरात संविधान प्रास्ताविका चौक स्मारक उभारण्यात यावे सरकारी कार्यालय आणि प्रत्येक शाळेमध्ये संविधान प्रतीचे वाचन करण्याचे आदेश देण्यात यावे असा इशारा रिपब्लिकन सेनेचे बुलडाणा जिल्हाध्यक्ष विजयकांत गवई यांनी निवेदनामध्ये दिला निवेदन देतेवेळी जिल्हा उपाध्यक्ष ब्रह्माभाऊ साळवे, जिल्हा महासचिव सलीमभाई, शहर उपाध्यक्ष सतीश पवार, तालुका संघटक रुषी हिवाळे, दीपक तायडे, सौरभ बावस्कर, शिवम कांबळे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page