अवैध सावकारी करणाऱ्या महिलेच्या घराची विशेष पथकाद्वारे झडती
आक्षपार्ह दस्तऐवज व धनादेश ही पथकाने केले जप्त
बुलढाणा : आपलं बुलढाणा जिल्हा बातमी- अवैध सावकारी करणाऱ्या मोताळा तालुक्यातील महिलेच्या घरी आज, शुक्रवारी सहकार विभागाच्या विशेष पथकाने झडती घेतली. पोलीस संरक्षणात करण्यात आलेल्या संयुक्त कारवाईत आक्षेपार्ह कागदपत्रे, दस्तावेज आणि धनादेश जप्त करण्यात आले.मोताळा तालुक्यातील कुऱ्हा येथील वंदना देवसिंग धोती या महिलेच्या घराची विशेष पथकाने झाडाझडती घेतली. जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा उप निबंधक नानासाहेब चव्हाण यांच्या पथकाने झडती घेतली. यावेळी संशयास्पद कोरे धनादेश, कोरे ‘बॉण्ड पेपर’, हिशोबाच्या नोंदी असलेल्या वह्या जप्त करण्यात आले. याची पडताळणी करून महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ नुसार कार्यवाही करण्यात येणार असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.
सविस्तर वृत्त असे की तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार श्रीमती वंदना देवसिंग घोती या अवैध सावकारीचा व्यवसाय करतात त्यांच्याकडून 2,50,000 रुपये वेगवेगळ्या तारखेला 10%,12% व 15% व्याज दराने घेतले होते. त्यानंतर फिर्यादी यांनी एप्रिल पर्यंत 50,0000 रुपये परत केले फिर्यादी यांनी त्यांना दिलेले चेक व बॉण्ड परत मागितले असता ते देण्यास टाळाटाळ करत होते चेक बाउन्स करण्याच्या धमक्या दिल्या होत्या. भारतीय स्टेट बँक चा चेक बाउन्स करून प्रकरण न्यायालय टाकलेले सुद्धा आहे पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकी सुद्धा त्यांनी दिली होती त्यामुळे फिर्यादी यांना आत्महत्या केल्याशिवाय पर्याय उरलेला नव्हता असे माहिती त्यांनी दिलेल्या तक्रारीत आहे.
सदर कार्याची पडताळणी करून ही कारवाई जिल्हाधिकारी, बुलढाणा तथा अध्यक्ष जिल्हा सनियंत्रण समिती आणि मा. पोलीस अधीक्षक बुलढाणा, जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सावकारी पथकातील श्री एस के गारोळे पथक प्रमुख तथा सहाय्यक निबंधक सहकारी संस्था खामगाव, श्री जी जे आमले सहकार अधिकारी श्रेणी 1, यु .के सुरडकर, श्री डी बी बोंडे, आर ए डहाके, आर बी बाबर, श्रीमती एस के घाटे, कु. आर बी शिरसाट, एन एस सोनुने, सी.एम गोंधळेकर, पोलीस प्रशासनातील भाग्यश्री पवार, धीरज रवी चंदन, तसेच पंच म्हणून जोशी व जाधव तहसील कार्यालय मोताळा यांनी ही कारवाई केली आहे.