Homeबुलढाणा (घाटावर)

जिल्हा क्रीडा पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

Spread the love

बुलढाणा- आपलं बुलढाणा जिल्‍हा बातमी-  जिल्ह्यातील उत्कृष्ठ क्रीडापटू, दिव्यांग गुणवंत खेळाडू व गुणवंत क्रीडा मार्गदर्शक यांचे कार्य, योगदानाचे मुल्यमापन होवून त्यांचा गौरव व्हावा व प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने गुणवंत क्रीडा मार्गदर्शक, गुणवंत खेळाडू (पुरुष व महिला), दिव्यांग गुणवंत खेळाडू यांना जिल्हा क्रीडा पुरस्काराने गौरविण्यात येते. यासाठी दि. 20 फेब्रुवारीपर्यंत अर्ज सादर करावे लागणार आहे. यावर्षी प्रजासत्ताक दिनी जिल्हा क्रीडा पुरस्काराचे वितरण करण्यात येणार होते. परंतु अपरिहार्य कारणामुळे दि. 26 जानेवारी 2024 रोजी जिल्हा क्रीडा पुरस्कार वितरीत केले जाणार नाही. त्यामुळे पात्र खेळाडू व क्रीडा मार्गदर्शकांनी परिपूर्ण प्रस्ताव दि. 20 फेब्रुवारी 2024 पर्यंत सादर करावे. सदर पुरस्कार महाराष्ट्र दिनी दि. 1 मे 2024 रोजी वितरीत करण्यात येतील. या पुरस्काराचे स्वरुप प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह आणि रोख 10 हजार रूपये असे आहे. त्या अनुषंगाने सन 2021-22 व 2022-23 च्या पुरस्कारासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.

पुरस्कारासाठी अर्ज करणाऱ्या अर्जदाराचे महाराष्ट्रात सलग 15 वर्षे वास्तव्य असावे. क्रीडा मार्गदर्शक म्हणून सतत दहा वर्षे महाराष्ट्रात क्रीडा मार्गदर्शनाचे कार्य केलेले असावे. त्याने वयाची 30 र्वो पुर्ण केली असणे आवश्यक आहे. गुणांकनाकरीता त्या जिल्ह्यातील खेळाडूंचीच कामगिरी ग्राह्य धरली जाईल. दिव्यांग खेळाडू व गुणवंत खेळाडू पुरस्कार वर्षासह लगतपूर्व 5 वर्षापैकी 2 वर्षे त्या जिल्ह्याचे मान्यताप्राप्त खेळांच्या अधिकृत स्पर्धांमध्ये प्रतिनिधीत्व केले असावे. एका जिल्ह्यामध्ये जिल्हा क्रीडा पुरस्कार प्राप्त करणारी व्यक्ती राज्यातील अन्य जिल्ह्यात जिल्हा क्रीडा पुरस्कारासाठी अर्ज करण्यास पात्र राहणार नाही. एकदा एका खेळामध्ये किंवा एका प्रवर्गामध्ये जिल्हा क्रीडा पुरस्कार प्राप्त केलेली व्यक्ती पुन्हा त्याच खेळात किंवा प्रवर्गात जिल्हा क्रीडा पुरस्कार मिळण्यास पात्र असणार नाही.

पुरस्कार वर्षाची गणना 1 जुलै ते 30 जुन अशी राहील. तीनही पुरस्काराकरीता अर्जासोबत सादर करण्यात आलेले प्रमाणपत्र व इतर कागदपत्रे पुन्हा सादर करु नये. अर्जदाराने सादर केलेली कागदपत्रे व प्रमाणपत्र सत्य असल्याबाबत संबंधित तहसिलदार यांच्याकडून ॲफीडीवेट करुन घ्यावे. विहीत नमुन्यातील अर्ज आणि पुरस्काराच्या अटी व शर्ती आणि अधिक माहितीसाठी इच्छुकांनी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा संकुल, क्रीडानगरी, जांभरुन रोड, बुलढाणा येथून अर्ज प्राप्त करुन घ्यावे. परिपुर्ण अर्ज सिल बंद लिफाफ्यामध्ये दि.20 फेब्रुवारी 2024 पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात सादर करावेत, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी बाळकृष्ण महानकर यांनी केले आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page