मेहकर येथे आजपासून कृषि महोत्सव, प्रदर्शनी
बुलढाणा- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी- डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त कृषि विभागातर्फे मेहकर येथे कृषि महोत्सव आणि कृषि प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले आहे. गुरूवार, दि. 25 जानेवारी 2024 पासून दि. 29 जानेवारीपर्यंत हा महोत्सव सुरू राहणार आहे. मेहकर येथील राजश्री आयुर्वेदिक महाविद्यालयासमोरील प्रांगणात ही प्रदर्शनी सकाळी 10 ते रात्री 9 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. कृषि प्रदर्शनीचे उद्घाटन गुरूवारी दुपारी २ वाजता पालकमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी खासदार प्रतापराव जाधव अध्यक्षस्थानी राहतील. आमदार संजय रायमुलकर स्वागताध्यक्ष म्हणून उपस्थित राहतील.
प्रमुख पाहुणे म्हणून खासदार रक्षाताई खडसे, आमदार किरण सरनाईक, वसंत खंडेलवाल, धीरज लिंगाडे, डॉ. राजेंद्र शिंगणे, डॉ. संजय कुटे, ॲड. आकाश फुंडकर, संजय गायकवाड, श्वेताताई महाले, राजेश एकडे, जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते, जिल्हा पोलिस अधीक्षक सुनील कडासने, विभागीय कृषि सहसंचालक किसन मुळे उपस्थित राहणार आहेत.योवळी नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आत्माचे प्रकल्प संचालक पुरुषोत्तम उन्हाळे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी मनोजकुमार ढगे, मेहकर बाजार समितीचे सभापती माधव जाधव, लोणार बाजार समितीचे सभापती बळीराम मापारी, मेहकर बाजार समितीचे उपसभापती विलास मेहरूत, लोणार बाजार समितीचे उपसभापती जगाराव आडे यांनी केले आहे.