राजश्री शाहू इंजिनिअरिंग कॉलेज व श्री संत गजानन महाराज कॉलेज ऑफ फार्मसी यांच्या संयुक्त विद्यमानाने हळदी-कुंकू कार्यक्रम संपन्न
सिंदखेडराजा आपलं बुलढाणा जिल्हा बातमी- अनिल दराडे- राजर्षी शाहू इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा मकर संक्रांतीच्या सणाचे अवचित्य साधून हळदी-कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. द्वारका बहुउद्देशीय ग्रामीण विकास फाउंडेशनच्या सचिव सौ. पद्माताई सावळे व अँड सौ. कीर्तीताई पऱ्हाड (सावळे) यांच्या वतीने महाविद्यालयात दिनांक 23 /01 / 2024 मंगळवार रोजी सायंकाळी 4:00 वाजता हळदी-कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले, हळदी-कुंकू कार्यक्रमासाठी जवळपास 450 महिलांनी उपस्थिती दर्शवली हळदी-कुंकाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने उखाणे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते उखाणे स्पर्धेत 40 महिलांनी सहभाग घेतला होता त्यात सौ.अनिता कापरे यांनी प्रथम क्रमांक पटकावून पैठणी साडीच्या त्या मानकरी ठरल्या सौ. पद्माताई सावळे व सौ. कीर्तीताई पऱ्हाड (सावळे) त्यांच्या हस्ते पैठणी देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. उखाणे स्पर्धेच्या जजेस म्हणून महाविद्यालयातील प्रा.अश्विनी झनके व प्रा. प्रगती वाघ यांनी काम पाहिले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. वैशाली घोराडे पाटील व प्रा. चेतना मालसमिंदर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राजर्षी शाहू इंजिनिअरिंग कॉलेज व श्री संत गजानन महाराज कॉलेज ऑफ फार्मसी च्या शिक्षक व शिक्षकेत्तर महिला कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.