मॉडेल डिग्री कॉलेज येथे क्रीडा सप्ताहाचे उद्घाटन.
बुलडाणा आपलं बुलढाणा जिल्हा बातमी- संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ द्वारा संचलित मॉडेल डिग्री कॉलेज बुलढाणा येथे क्रीडा सप्ताह आयोजन करण्यात आले आहे . दि 30 जानेवारीला या क्रिडा सप्ताह अंतर्गत क्रिकेट सामन्याचे उद्घाटन मॉडेल डिग्री कॉलेजचे मानद संचालक डॉ.अण्णासाहेब म्हळसने यांच्या हस्ते झाले . यावेळी प्रमुख अतिथी प्रा. अरविंद देशमुख तसेच क्रीडा विभाग प्राध्यापिका गायके मॅडम , प्रा. गुलाबराव सोनोने,प्रा.ज्ञानेश्वर साखरे प्रा.किशोर बुलकडे प्रा.पारवे आदी उपस्थित होते हे क्रिकेट सामने कला वाणिज्य आणि विज्ञान विभागाच्या अंतर्गत खेळल्या जाणार आहेत . खेळाडूंनी सांघिक भावनेने खेळ खेळावा असे आवाहन उद्घाटन पण कार्यक्रमात मॉडेल कॉलेजचे मानद संचालक अण्णासाहेब म्हळसणे यांनी व्यक्त केलंय . या क्रिडा स्पर्धा मध्ये मॉडेल डिग्री कॉलेज मधील विद्यार्थी विद्यार्थिनी सहभागी झाल्या आहेत .