सैलानी बाबा दर्गा परिसराने घेतला मोकळा श्वास…
रायपूर ठाणेदार दुर्गेश राजपूत यांची गांधीगिरी...
चिखली- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी- महेद्र हिवाळे- सैलानी बाबा दर्गा, पिंपळगाव सराई रायपूर येथे जग प्रसिद्ध असलेले सैलानी बाबा यांची दर्गा असून सदर दर्गा दर्शना साठी नेहमी हजारो भाविक हे नतमस्तक होण्यासाठी येत असतात. बाबा चे दर्शनासाठी विशेष करून सर्व धर्मातील लोक हे मोठ्या भक्ती भावाने येत असतात … या ठिकाणी तुम्हाला खऱ्या अर्थाने जाती धर्म विरहित भाविक व माणसे पाहायला मिळतात.. इतर पोलीस स्टेशन पेक्षा रायपूर सैलानी येथे नोकरी करणे म्हंजे एक दिव्यच आहे .. कारण
रायपूर पो स्टे अंतर्गत व ज्या साठी रायपूर पो स्टे ची निर्मिती झाली ते म्हणजे सैलानी बाबा दर्गा .. सैलानी बाबा दर्गा येथे दरवर्षी मार्च महिन्यात होळी चे वेळेस जवळपास 15 दिवसांची मोठ्या प्रमाणात यात्रा भरतं असते व त्यात राज्य परराज्यातून भाविक हे लाखो चे संख्येने येत असतात .व दैनंदिन हजारो लोक येथे दर्शनासाठी येत असतात. अशा मुळे येथे नेहमी अस्वच्छता, घाणीचे साम्राज्य पाहायला मिळते. तसेच गुन्हेगार याचां फायदा घेऊन आश्रय घेण्यासाठी येत असतात. तसेच दर्गा ट्रस्ट व मूळ मुजावर जमीन मालक यांचा सुरू असलेला न्यायालयीन वाद व त्यातून सदर ठिकाणी कोणतेही काम करण्यास प्रशासनास येणाऱ्या अडचणी.या सर्व परिस्थितीत पोलिसांना सैलानी येथे काम करायचे असते. त्यामुळे येथे नेमणूक झाल्यावर सैलानी येथे आल्यावर बरेच अधिकारी हे निराश होत असतात..
परंतु या मध्ये ठाणेदार म्हणून या ठिकाणी गेल्या सहा महिन्यापासून येथे कामकाज करीत आहे स.पो.नी दुर्गेश राजपूत हे वेगळे ठरत आहेत.
ठाणेदार राजपूत यांनी आल्यापासून पो स्टे ची सूत्रे हातात घेतल्या पासून सर्वात जास्त सैलानी बाबा दर्गा येथे लक्ष केंद्रित केले व त्या ठिकाणी काय काय करता येईल या साठी कामकाज सुरू केलें व लोकांना मार्गदर्शन करून स्वच्छतेचे महत्व पटवून दिले येथेच त्यांनी सर्वांची मने जिंकली ..यानंतर त्यांनी सुरक्षेचे दृष्टीने परिसरातील गुंड, गुन्हेगार,भोंदू बाबा ,मोबाईल चोर, पाकीट मार यांचा चोख बंदोबस्त केला. सैलानी दर्गा येथे अजून एक मुख्य अडचण होती ती म्हणजे दर्गा कडे जाताना असलेले दुकानदारी अतिक्रमण , व इतर फॉरेस्ट अतिक्रमण .ठाणेदार राजपूत यांनी फॉरेस्ट विभाग यांची मदत घेऊन मागील महिन्यात फॉरेस्ट जमिनीवरील अतिक्रमण देखील हटावले ..
परंतु या मध्ये सर्वात महत्वाचे होते दर्गा कडे जात असताना फुल, चादर,लोभान ई.विक्रेते दुकानदार यांचे अतिक्रमण व त्या मधून दर्गा पर्यंत पोहचण्यासाठी तयार झालेला निमुळता व अरुंद रस्ता . याबाबत ठाणेदार दुर्गेश राजपूत यांना सदर रस्ता हा निमुळता असल्याने व भाविकांना येण्या जाण्यासाठी होणारी अडचण नेहमी खटकत होती, परंतु सदर बाबत कोणालाही विचारणा केली असता साहेब ते शक्य होणार नाही मुजावर, दुकानदार लोक ऐकणार नाहीत ..आज पर्यंत कोणतेही ठाणेदार यांनी हा रस्ता मोकळा केला नाही, प्रॉब्लेम, वाद होतील अशा प्रकारची माहिती त्यांना वारंवार मिळत होती.परंतु ठाणेदार दुर्गेश राजपूत यांनी लोकांशी प्रेमाने संवाद साधण्याची कला व तगडा अनुभव याचे जोरावर त्यांनी सैलानी दर्गा बद्दल व येथील लोका बद्दल असलेली मानसिकता बदलून टाकावी या हेतूने त्यांनी सर्व दुकानदार यांचे शी संवाद साधून सर्व दुकाने पाठी मागे नेण्यास व रस्ता मोकळा करण्याबाबत समजावून सांगण्यास सुरुवात केली .. पहिल्या प्रयत्नात पाहिजे तसा प्रतिसाद मिळाला नाही परंतु विरोध ही झाला नाही त्यातून राजपूत यांनी प्रेमळ संवाद साधून येता जाता प्रत्येक भेटी मध्ये दुकानदार यांना बोलावून समजवून सांगणे फायदे तोटे, मदत, भाविक सुरक्षा या बाबी वारंवार सांगून व त्यांची सांगण्याची तळमळ पाहून दुकानदार , मुजावर लोकांना पाझर फोडण्यात अखेर ठाणेदार यशस्वी झाले व जे मागील एका संपूर्ण शतकात कोणी अधिकारी करू शकले नाही ते काम ठाणेदार दुर्गेश राजपूत यांनी करून दाखवले व ते देखील कोणत्याही कायद्याचा धाक दाखवून नव्हे तर प्रेमाने व मधुर संवाद साधून त्यांनी सर्व दुकानदार मुजावर लोक यांची मने जिंकली व सर्व दुकानदार यांनी स्वतः हुन त्यांची दुकाने जवळपास 15 – 15 फूट मागे घेतली व रस्ता मोकळा केला व अखेर सैलांनी बाबांनी मोकळा श्वास घेतला असे म्हणण्यास हरकत नाही.
ठाणेदार राजपूत हे येथेच न थांबता त्यांनी आज रोजी सर्व दुकानदार यांनी प्रशासनास मोठ्या मनाने सहकार्य केले म्हणून ठाणेदार राजपूत यांनी दर्गा परिसर येथे कार्यक्रम घेऊन स्वहस्ते संबंधित दुकानदाराचा सत्कार देखील बाबांचे चरणी करून दिला या गांधीगिरी मुळे दुकानदार सुद्धा भारावून गेले.. व दुकानदार यांनी सुद्धा ठाणेदार दुर्गेश राजपूत यांचा अशा विशेष कार्याचा यथोचित सन्मान करून त्यांचा सत्कार केला व यापुढे प्रशासनाला नेहमी सहकार्य करू असे आश्वासन दिले..ठाणेदार राजपूत यांनी सैलानी मध्ये विविध विषयांवर काम चालू केले असून त्यात संपूर्ण स्वच्छता , कारवा चौक येथे रस्त्यावर वाहने उभे राहू नये या करिता पे अँड पार्क पार्किंग , सुरक्षा म्हणून संपूर्ण पोलीस यंत्रने मार्फत cctv कॅमेरे. लॉज,/ भाडेकरू रेकॉर्ड ठेवणे अशा प्रकारची कामे चालू केलेली आहेत तसेच काही महिन्यांवर येऊन ठेवलेल्या यात्रेचे आतापासूनच त्यांनी नियोजन करने सुरू केले असल्याचे त्यांचे कामावरून दिसून येत आहे ..
सदर विशेष कामाची संकल्पना ही मां.पो.अधीक्षक श्री.सुनील कडासने , आ.पो.आ श्री महामुनी, उपविभागीय पो.आधी. श्री गुलाबराव वाघ यांचे मार्गदर्शन खाली राबविण्यात आली.