बुलढाणा जिल्हा भाजपची राजे गार्डन येथे जिल्हा कार्यशाळा संपन्न
प्रत्येक गाव प्रत्येक बूथ वर पोहचण्याचे पदाधिकारी यांना आदेश
बुलढाणा:-आपलं बुलढाणा जिल्हा बातमी- आगामी लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजल्याने भारतीय जनता पक्ष ऍक्शन मोड वर आलेला दिसत आहे या अनुषंगाने आज दि. 29 जानेवारी 2024 रोजी येथे बुलढाणा जिल्हा भाजपची जिल्हा कार्यशाळा व गाव चलो अभियानाची महत्वपूर्ण बैठक स्थानिक राजे गार्डन येथे संपन्न झाली. बैठकीस मार्गदर्शक म्हणून प्रामुख्याने भाजपा प्रदेशाचे नेते दिनेशजी सूर्यवंशी, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष मा.आ.चैनसुखजी संचेती, लोकसभा प्रमुख मा.आ.विजयराज शिंदे, जिल्हाध्यक्ष डॉ गणेशजी मांटे, माजी आमदार तोतारामजी कायंदे, लोकसभा समन्वयक मोहनजी शर्मा, लोकसभा विस्तारक संतोषजी देशमुख ई मान्यवरांची उपस्थिती होती.
बैठकीस मार्गदर्शन करतांना दिनेशजी सूर्यवंशी यांनी जिल्हा कामकाजाचा आढावा घेत आगामी लोकसभा निवडणुकीसाठी 400 च्यावर जागा जिंकण्यासाठी भाजपा सज्ज झाली असुन त्यासाठीचा पाया असणारा बूथ मजबूत करण्याच्या सूचना पक्ष पातळीवरून देण्यात आलेल्या आहे त्यासाठी भाजपचे आता गाव चलो अभियाना राबविण्यास सुरवात केली असून प्रत्येक गाव व प्रत्येक बूथ मजबूत करण्यासाठी सर्वच तोल मोलाच्या पदाधिकारी कामाला लागण्याचे निर्देश या प्रसंगी आपल्या भाषणातुन दिले आहे.याशिवाय प्रदेश उपाध्यक्ष चैनसुखजी संचेती, मा.विजयराज शिंदे व डॉ गणेशजी मांटे यांची यथोचित भाषणे झाली त्यातून पदाधिकारी यांना विशेष जबाबदारी देन्यासाठी सविस्तर मार्गदर्शन यावेळी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते यांना केले आहे. यावेळी बुलढाणा शहर व तालुक्यातील विविध मान्यवरांनी लोकसभा प्रमुख विजयराज शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून उपस्थित मान्यवरांच्या हस्ते भाजपचा रुमाल गळ्यात घालून भाजपा पक्षात जाहीर पक्ष प्रवेश केला. त्यामध्ये बुलढाणा तालुक्यातील आज्ञात्मिक व धार्मिक क्षेत्रात काम करणारे लोक कलावंत, प्रमोद दांडगे, लोकशाहीर हरिदास खांडेभराड, कलावंत भारत सोनुने, भजनी कलावंत अशोकभाऊ इंगळे, जेष्ठ कलावंत काशीराम निकम, अरुण गिरी, पुरुषोत्तम दांडगे, श्री समाधान तोटे, सुभाष सोनुने, हर्षल चव्हाण, ह.भ.प.देविदास जाधव व त्यांचे इतर सहकारी यांचा समावेश आहे.
तसेच बुलढाणा शहराध्यक्ष अनंता शिंदे यांच्या मार्गदर्शनात बुलढाणा शहरातील रामेश्वर लवंगे, सुनील शिंदे, शेख अनिस, संजय सुरडकर, संजय शिंदे ,विलास सोनुने, सौ उषाताई इंगळे, पूजा विधाते, शिला भालेराव, सुनीता पंडित ,स्वाती हिवाळे व इतर ४० ते ५० जणांनी जाहीर प्रवेश केला आहे. यानंतर घाटावरील विधानसभा मतदार संघा निहाय पदाधिकारी यांच्या बैठका घेण्यात आल्या व त्यांना मान्यवरांनी उचित मार्गदर्शन व सूचना केल्या. या बैठकीस जिल्हा सरचिटणीस सर्व गजानन घुले, देवीदासजी पाटील, यशवंत पाटील, विधानसभा प्रमुख चिखलीचे सुनीलजी वायाळ, मेहकर विधानसभा प्रमुख प्रकाश गवई, भाजपा जेष्ठ नेते माजी नगराध्यक्ष गोकुलजी शर्मा, प्रदेश प्रतिनिधी दिपकजी वारे, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष सिंधुताई खेडेकर यांसह आजी माजी लोकप्रतिनिधी, जिल्हा कार्यकारिणी सदस्य ,सर्व मंडळ अध्यक्ष, सर्व आघाडी, मोर्चा प्रकोष्ठ जिल्हा पदाधिकारी, तालुका सरचिटणीस यांसह प्रमुख पदाधिकारी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.