अवैध धंदे बंद करण्यासाठी चक्क पत्रकारांना बसावे लागले उपोषणाला
उपोषणचा ६ वा दिवस निघाला मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष
बुलढाणा :-आपलं बुलढाणा जिल्हा बातमी- बुलढाणा,रायपूर, सैलानी,चिखली पोलीस स्टेशन हद्दीतील व या परिसरातील अवैध धंदे वरली मटका जुगार अड्डे बंद करण्यात यावे. या मागणीसाठी बुलढाण्यातील पत्रकार पुरुषोत्तम बोर्डे व इस्रार देशमुख यांनी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आंदोलन सुरू केले आहे.
आज आंदोलनाचा ६ वा दिवस असून अद्याप पर्यंत प्रशासनाने दखल घेतलेली नाही. तर आंदोलनाची दखल न घेतल्यास विभागीय कार्यालयासमोर आणि मंत्रालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा यावेळी आंदोलन करते पत्रकार पुरुषोत्तम बोर्डे इस्रार देशमुख यांनी दिला आहे. तसेच हा उपोषणाला राजकारणी पार्टी यांनी सुद्धा बेमुदत आंदोलन ला पाठिंबा दिला आहे. खासदार प्रतापराव जाधव,मा.आ.भाजप बुलडाणा लोकसभा प्रमुख विजयराज शिंदे, राष्ट्रवादी काँगेस पार्टी महिला जिल्हाध्यक्ष प्रा अनुजा साळवे, महीला शहर अध्यक्ष नाजमा शेख यांनी सर्वांनी भेट देऊन पाठिंबा दिला आहे. अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेचे राज्य उपाध्यक्ष इंजि. अशोक भोसले, जिल्हा कार्याध्यक्ष इंजि. शिवाजी जोहरे, डॉ बबनराव परमेशोर, अनिल बोरकर, राजुभाऊ इरछे, समाधान चिंचोले, विलास खंडेराव यांनी सुध्दा भेट देऊन जाहिर पाठिंबा दिला. मागण्या लवकर मान्य न झाल्यास तिव्र स्वरुपाचे आंदोलन करण्यात येणार आहे असा इशारा आंदोलन कर्ते पत्रकार पुरुषोत्तम बोर्डे इस्रार देशमुख यांनी दिला