विवाहितेवर अत्याचार करत मुलीचाही केला विनयभंग
खामगाव :-आपलं बुलढाणा जिल्हा बातमी- विवाहितेवर बळजबरीने अत्याचार करून तिच्या १० वर्षीय मुलीचा विनयभंग करण्यात आला. ही घटना खामगाव शहरातील एका वस्तीत घडली. या घटनेमुळे खामगावात एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी तक्रारीवरून आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला.
तक्रारीनुसार, खामगाव शहरापासून जवळच असलेल्या वस्तीत वास्तव्यास असलेल्या महिलेवर एका ३७ वर्षीय इसमाने बळजबरीने अत्याचार केल्याचे म्हटले. १० जानेवारी ते ११ जानेवारी दरम्यान ही घटना घडली. घटनेनंतर विवाहिता तक्रार देण्यासाठी जात असताना आरोपीने तिच्यावर दबाव आणला. तसेच तिच्या दहा वर्षांच्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग करीत दहशत निर्माण केल्याचा आरोप पीडितेने तक्रारीत केला. बदनामीच्या भीतीने विलंबाने तक्रार दाखल केल्याचेही तक्रारीत नमूद केले.