Homeक्राईम डायरीबुलढाणा (घाटावर)

मालवाहू वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

Spread the love

देऊळगाव राजा :-आपलं बुलढाणा जिल्‍हा बातमी- भरधाव मालवाहू वाहनाने दुचाकीस धडक दिल्याने एक जण जागीच ठार झाल्याची घटना जालना चिखली रोडवरील दगडवाडी फाट्याजवळ २ फेब्रुवारी रोजी रात्री घडली. याप्रकरणी देऊळगाव राजा पोलिस स्टेशनला मालवाहू वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. गौतम पुंडलिक पैठणे, रा. काटोडा असे मृताचे नाव आहे.
चिखली तालुक्यातील काटोडा येथील गौतम पुंडलिक पैठणे हे देऊळगाव राजा येथून त्यांच्या गावी त्यांच्या दुचाकी क्रमांक एमएच ०४ – डीझेड ७५९१ ने जात होते. यावेळी दगडवाडी फाट्याजवळ समोरून भरधाव येत असलेल्या मालवाहू वाहन क्रमांक एमएच २८ बीबी ०७६१ ने त्यांच्या दुचाकीस जबर धडक दिली. घटनेची माहिती मिळताच डॉ. अक्षय गुट्टे हे अॅम्बुलन्ससह घटनास्थळावर पोहोचले. परंतु, धडक गंभीर असल्यामुळे पैठणे यांचा जागीच मृत्यू झाला आहे. याप्रकरणी संदीप देवबा पैठणे, रा. काठोडा पोस्ट गांगलगाव तालुका चिखली यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वाहनचालकाविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा अधिक तपास पोलिस हेडकॉन्स्टेबल विश्वनाथ काकड करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page