बालकांची शैक्षणिक सुरुवात अंगणवाडीतूनच
सिंदखेडराजा-आपलं बुलढाणा जिल्हा बातमी- अनिल दराडे- सिंदखेडराजा तालुक्यातील तांदुळवाडी येथील मिनी अंगणवाडी केंद्रामध्ये पालक निळायचे आयोजन तीन फेब्रुवारीला करण्यात आले होते, यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सरपंच शशिकला भोसले, उपसरपंच शिवगंगा जायभाये, ग्रामपंचायत सदस्य संध्या कायंदे, शिवराज कायंदे, सचिव विनोद सातपुते उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. तदनंतर सचिव विनोद सातपुते यांनी आपले विचार व्यक्त करताना सांगितले की बालकांच्या शैक्षणिक विकासाची खरी सुरुवात अंगणवाडी मधूनच होते, म्हणून खऱ्या अर्थाने अंगणवाडी शिवीकेजी खूप मोठी योगदान असून प्रत्येक पालकाने आपल्या बालकाला नेहमी धनगरवाडी मध्ये पाठवावे म्हणजे त्यांचा शैक्षणिक पाया मजबूत होईल, तसेच शिवराज गांधी यांनी सुद्धा व्यक्त विचार करून अंगणवाडीला सर्व मदत करण्यास आम्ही सदैव तयार आहोत असे सांगितले. यावेळी अंगणवाडीला ग्रामपंचायत कडून स्वयंपाकाचे साहित्य देण्यात आले. तर प्राध्यापक धनश्री कायंदे यांच्याकडून महापुरुषांच्या प्रतिमा सप्रेम भेट देण्यात आल्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सेवानिवृत्त पोलीस अधिकारी प्रकाश खरात यांनी केले तर आभार प्रदर्शन अंगणवाडी सेविका प्रिया खरात यांनी केले यावेळी कार्यक्रमाला सिताराम जाधव, विजय काळे, राजू खरात, शिवाजी खरात, राहुल खरात, वैभव खरात, हरिभाऊ जायभाये, राजू कायंदे हजर होते