कोळी समाज संघाचे तालुकाध्यक्ष प्रकाश शेळके यांनी केले अनोखे आंदोलन
चिखली :-आपलं बुलढाणा जिल्हा बातमी- कोळी समाज बांधवांना अनु.जमातीचे जातीचे दाखले देण्यात यावे या मागणीसाठी बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर समाजबांधवांनी आमरण उपोषण सुरु केले असून या उपोषणाला संपूर्ण बुलडाणा जिल्ह्यातून कोळी समाजबांधवांनी पाठींबा दिला आहे. त्याचाच एक भाग म्हणून चिखली तालुक्यातील भोकर येथील महाराष्ट्र कोळी समाज संघाचे चिखली तालुकाध्यक्ष प्रकाश शेळके यांनी 2 फेब्रुवारी रोजी स्वत:ला जमिनीत गाडून घेवून अनोखे आंदोलन केले.
गेल्या अनेक वर्षापासून बुलडाणा जिल्ह्यातील कोळी समाजबांधवांना अनु.जमातीचे जात प्रमाणपत्र मिळत नसल्यामुळे त्यांचा हक्क हिरावून घेतला जात असून बुलडाणा येथे सुरु असलेल्या समाज बांधवांच्या उपोषणाला पाठींबा दर्शवित हे आंदोलन करण्यात आले.
यावेळी महाराष्ट्र कोळी समाज संघाचे विदर्भ अध्यक्ष दीपक कोळी, गजानन फोलाने, अमोल दांडगे, रवी वाघ, शेषराव नेवरे, शरद नेवरे, गोपाल नेवरे, भीमराव फोलाने, गणेश देवकर, बाळू नेवरे, किशोर नेवरे, विठठ्ल फोलाने, सतीश सरोदे, समाधान नेवरे, राजू देवकर, सिध्दू नेवरे, गजानन नेवरे, छत्र देवकर, शंकर मुरडकर, वैभव वाहक, आकाश नेवरे, सुपडाबाई वाघ, मीरा फोलाने, सावित्रीबाई फोलाने, सुमनबाई फोलाने, प्रल्हाद कर्हाडे, जितेंद्र फोलाने, आतिश देवकर, राज धनराज, बळी फोलाने, ज्योती नेवरे, शारदा नेवरे, कल्हाणी नेवरे, सुलाबाई देवकर, विजू महाराज, उषा देवकर, वनिता शेळके, जिजाबाई वाघ, कमलबाई वाघ, सचिन नेवरे, वैभव वाघ, भागवत देवकर, अजय नेवरे, विकास नेवरे, प्रदीप नेवरे, गोपाल नेवरे, आकाश मादनकर, स्वामी फोलाने, कुणाल नेवरे, रितेश फोलाने, श्रावण इंगळे आदी पदाधिकारी व समाजबांधव उपस्थित होते.