गळफास घेऊन विवाहितेची आत्महत्या
मोताळा :- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी- २५ वर्षीय विवाहितेने ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन जीवनयात्रा संपविल्याची घटना माळेगाव येथे २ फेब्रुवारी रोजी साडेबारा वाजेच्या सुमारास उघडकीस आली. पूजा आकाश बरडे असे मृत महिलेचे नाव आहे.तालुक्यातील माळेगाव येथील पूजा आकाश बरडे या २५ वर्षीय विवाहितेने २ फेब्रुवारी रोजी साडेबारा वाजेच्या सुमारास घरामागील मालोच्याला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतला होता. यावेळी नातेवाइकांनी तिला तत्काळ उपचारासाठी बुलढाणा येथील सामान्य रुग्णालयात हलविले असता त्याठिकाणी डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. दरम्यान, बुलढाणा येथे शून्यमध्ये प्रकरण दाखल करण्यात आले होते. ८ फेब्रुवारी रोजी बोराखेडी पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पीएसआय विजयकुमार घुले आणि सुनील थोरात करत आहे.