Homeबुलढाणा (घाटावर)

मतदानाची टक्केवारी कमी असलेल्या क्षेत्रात जनजागृती करणार-जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील

निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविणार

Spread the love

बुलढाणा- आपलं बुलढाणा जिल्‍हा बातमी: लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी 70च्या वर नेण्यासाठी सर्वकष प्रयत्न करण्यात येतील. यात प्रामुख्याने मतदानाच्या सरासरीपेक्षा कमी मतदान झालेल्या 32 मतदान केंद्राच्या क्षेत्रात मतदान करण्याबाबत जनजागृती करण्यावर भर देण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी दिली.लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यात निवडणुकीशी संबंधीत कामकाजांना वेग देण्यात आला आहे. यात प्रामुख्याने मृत्यू झालेले आणि इतर ठिकाणी गेलेल्या मतदारांची नावे वगळणे, नवीन मतदारांची प्रामुख्याने 18 ते 19 वयोगटातील युवकांची नवमतदार म्हणून नोंदणी करण्यात येत आहे. युवकांनी मतदार नोंदणी करून मतदानासाठी पुढे यावे, यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. सध्या नोंदणी झालेल्या मतदारांमध्ये 18 ते 19 वयोगटातील 27 हजार मतदार आहेत.सुमारे 29 लाख लोकसंख्या असलेल्या जिल्ह्यात सुमारे 20 लाख मतदार नोंदणी झाली आहे. यात जिल्ह्याचे लिंगगुणोत्तर हे 934 आहे. येत्या लोकसभा निवडणुकीत मतदान करण्यासाठी मतदार नोंदणी अद्यापही सुरू आहे. यात नोंदणी करण्यासाठी अद्यापही संधी आहे. यात 66 हजाराहून अधिक नोंदणी झालेल्या आहे. जिल्ह्यात 2 हजार 265 मतदान केंद्र राहणार आहे. यात सुमारे 100 ठिकाणी चार हून अधिक मतदान केंद्र एकाच ठिकाणी राहणार आहे.

यावेळी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या मतदानाववेळी आदर्श मतदान केंद्र निर्माण करण्यात येणार आहे. यात नागरी भागात 66, तर ग्रामीण भागात 54 मतदान केंद्र आदर्श बनविण्यात येणार आहे. तसेच 72 मतदान केंद्र युवा अधिकारी-कर्मचारी, तर 36 मतदान केंद्र महिला अधिकारी-कर्मचारी हाताळणार आहेत. तसेच काही ठिकाणी दिव्यांग अधिकारी-कर्मचारी मतदान केंद्र सांभाळणार आहे. सुमारे 1 हजार 200 मतदान केंद्राचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे.गेल्या लोकसभा निवडणुकीवेळी दोन मतदान केंद्रावर 20 टक्क्यापेक्षा कमी मतदान झाले होते. यात जळगाव आणि मेहकर विधानसभा मतदारसंघातील प्रत्येकी एका मतदान केंद्राचा समावेश आहे. तसेच 21 ते 40 टक्केदरम्यान बुलडाणा 29, सिंदखेड राजा 1 अशा 30 मतदान केंद्राचा समावेश आहे. तसेच 41 ते जिल्ह्याच्या सरासरीपेक्षा कमी मतदान झालेल्या 850 मतदान केंद्राच्या क्षेत्रात विशेष लक्ष देण्यात येणार आहे. या क्षेत्रात मतदार नोंदणी, मतदान जनजागृतीसाठी विशेष प्रयत्न करण्यात येतील, असेही जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page