जी – स्पार्क चषक क्रिकेट स्पर्धेचे थाटात उद्धाटन
बुलढाणा- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी- भारत विद्यालय क्रिकेट अँकॅडमी, बुलडाणा च्या वतीने आयोजित जी – स्पार्क चषक क्रिकेट स्पर्धेचे आज भारत विद्यालयाच्या अध्यक्षा डॉ सीमा आगाशे व प्रबोधन विद्यालयाचे उप प्राचार्य श्री चीम सर यांचे हस्ते थाटात उद्धाटन झाले. या प्रसंगी श्री अरविंद पवार, श्री कुलकर्णी, श्री अरुण सौभागे, श्री संदेश पाटील, श्री संजय देवल, श्री सावरमल शर्मा उपस्थित होते.
ज्या खेळाडूंनी भारत विद्यालय क्रिकेट अकादमी ला राज्य स्तरावर पोहचवण्यात मोठी भूमिका बजावली असते अश्या खेळाडूंच्या सन्मानार्थ त्यांच्या नावाच्या सुरुवातीच्या अक्षरा पासून ट्रॉफी ला नाव दिल्या जाते .ही पद्धती गेल्या सात वर्षांपासून सुरू आहे. या मुळे शाळा सोडून जाणाऱ्या खेळाडूंचा सन्मान राखल्या जातो, नवीन खेळाडूंना खेळायला एक स्पर्धा मिळते व चांगली कामगिरी करण्याची जिद्द निर्माण होते व आपल्या नावाने सुद्धा अशीच ट्रॉफी व्हावी अशी इच्छा निर्माण होते.या वर्षी गौरव कोठाळे, सुयश सरदार, सुमेध जाधव, पुष्कर देशपांडे, प्रथमेश शेळके, अवधूत कुलकर्णी, अनिकेत मापारी, रंजित रबडे, कौस्तुभ मेहुणकर या खेळाडूच्या सन्मानार्थ स्पर्धेचे नामकरण केले आहे. या प्रसंगी या सर्व खेळाडूंना कॅप ऑफ ऑनर प्रदान करण्यात आली. याच समारंभात गेल्या वर्षी विविध क्रिकेट संघातील उत्कृष्ट खेळाडू कुणाल पाटील, मिहिर माळी, तन्वी तायडे, प्रणिता उगले,ओम तायडे, समर्थ लोखंडे यांना देखील कॅप ऑफ ऑनर प्रदान करण्यात आली. प्रबोधन विद्यालयाचे उप प्राचार्य झाल्याबद्दल श्री.गजानन चिम सर यांचा, 21किमी. जालना मॅरेथॉन मध्ये प्रभावी कामगिरी केल्याबद्दल श्री अरुण सौभागे यांचा ,विद्यापीठ क्रिकेट मध्ये कलर कोट मिळाल्या बद्दल भारत क्रिकेट अकॅडमी चा खेळाडू अनुराग गवई याचा व तळमळतेने क्रिकेट प्रशिक्षण केल्याबद्दल श्री. सावरमल शर्मा यांचा शाल श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. उद्घाटन समारंभाचे संचलन व आभार प्रदर्शन श्री संजय देवल यांनी केले.
भारत विद्यालय क्रिकेट अकादमी चां 19 वर्षाखालील मुलांचा संघ यावर्षी राज्य स्तरावर पोहोचला होता. भारत विद्यालयाने आतापर्यंत 33 राज्यस्तरीय क्रिकेट संघ व 524 राज्य स्तरीय क्रिकेट खेळाडू दिले आहेत हे विशेष.