वाळूची अवैध वाहतूक करणारे टिप्पर जप्त
नायब तहसीलदार डॉ आस्मा मुजावर यांची धाडसी कारवाई
सिंदखेडराजा – आपलं बुलढाणा जिल्हा बातमी -अनिल दराडे-अवैध रेती तस्कराचा कर्दनकाळ असलेल्या महसूल नायब तहसिलदार डॉ अस्मा मुजावर यांनी धाडसी कारवाई करीत तालुक्यातील अंढेरानजीक अवैध वाळू वाहतूक करताना एक टिप्पर पकडून दंडात्मक कारवाई साठी अंढेरा पोलीस ठाण्यात लावल्याने रेती माफिया मधे दहशद पसरली आहे.तालुक्यात खडकपूर्णा नदी पात्रातून दररोज शेकडो ब्रास रेतीचे अवैध उत्खनन करून जिल्ह्यासह जिल्ह्याबाहेर वाहतूक करण्यात येते. नायब तहसीलदार डॉ आस्मा मुजावर या अवैध वाळू प्रतिबंधक पथकात गस्तीवर असताना त्यांना अंढेरा फाट्यानजीक एमएच-२८-एबी- ९१९९ या क्रमांकाचे चिखलीच्या दिशेने जाताना दिसले त्यांनी पाठलाग. करून वाहन अडवून चौकशी केली असता त्यात चार ब्रास बेकायदा वाळू आढळली. टिप्परचालक हर्षल सांडू देवकर (भानखेड) यास विचारणा केली असता सदर टिप्पर सचिन देविदास चित्ते (निमगाव गुरु) यांच्या मालकीचे असल्याचे सांगितले . सदर टिप्पर जप्त करून दंडात्मक कारवाई साठीअंढेरा पोलिसांत जमा केले आहे या धाडसी कारवाई मुळे रेती तस्करात दहशद पसरली आहे