श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रिडा व सांस्कृतिक प्रतिष्ठान च्या वतीने घेण्यात आलेल्या कबड्डी स्पर्धेचे बक्षीस वितरण
माही बहुउद्देशीय मंडळ मुर्तिजापुर प्रथम तर जय संतोषी माॅ जानेफळ द्वितीय
खामगाव- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी- स्थानिक खामगाव हिंदवी स्वराज्य संस्थापक अखंड हिंन्दुस्थान चे प्रेरणा स्थान श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रिडा व सांस्कृतिक प्रतिष्ठान शिवाजी महाराज नगर च्या वतीने राज्यस्तरीय आमंत्रित भव्य दिव्य कबड्डी स्पर्धा चे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये दिं ९ फेब्रु ते ११ फेब्रु दरम्यान येथील शिवाजी महाराज स्टेडियम वर पार पडलेल्या आमंत्रित कबड्डी स्पर्धेचे बक्षीस वितरण ११ फेब्रुवारी च्या रात्री करण्यात आले या मध्ये मुर्तिजापुर येथील माही बहुउद्देशीय मंडळ अव्वल तर जानेफळ चे जय संतोषी माॅ द्वितीय ठरले आहेत . अनुक्रमे ५१ , ३१व २१ हजाराचे रोख बक्षीस देवुन या संघाचा खासदार प्रतापराव जाधव यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
शिवजयंती महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले. त्यापैकी आमंत्रित कबड्डी स्पर्धेत अमरावती. धुळे. भुसावळ. तरहाळा. वाशिम. खामगाव, जळगाव,भोपाळ,अकोला, मुर्तिजापूर, नागपूर, पुणे, नगर, जानोरी, या जिल्ह्यातील व इतर ठिकाण च्या १९ संघांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. सतत ३ दिवस चाललेल्या स्पर्धेत सहभागी कबड्डी संघातील खेळाडूंनी आपले कसब दाखविले.
अखेर चा सामना ११ फेब्रुवारी च्या रात्री झाला. या मध्ये माही बहुउद्देशीय मंडळ व जय संतोषी माॅ या कबड्डी संघात खेळला गेला. या मध्ये माही बहुउद्देशीय मंडळ ने जय संतोषी माॅ कबड्डी संघावर मात केली. त्यानंतर रात्री असंख्य नागरिकांच्या उपस्थित श्री शिवाजी महाराज स्टेडियम वर बक्षीस वितरण पार पडले. या प्रसंगी खासदार श्री प्रतापराव जाधव लोकसभा मतदारसंघ बुलढाणा ,श्री अशोक भाऊ सोनोने प्रदेशाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी, श्री अजिंक्य बोबडे सेवा निवृत्त साहेब पोलीस आयुक्त, श्री संदिप शेळके अध्यक्ष वन मिशन, श्री प्रितमजी जाधव ठाणेदार शिवाजी नगर, श्री नरूभाऊ खेडेकर जिल्हा प्रमुख शिवसेना उ बा ठा गट, श्री सुभाष राव पेसोडे सभापती कृ ऊ बा समिती, श्री डॉ सदानंद इंगळे अध्यक्ष आय एम ए,श्री शरद भाऊ वसतकर प्रदेश उपाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी, श्री राजेश जी राजोरे जेष्ठ पत्रकार , श्री अशोक बाप्पु देशमुख अध्यक्ष विदर्भ कबड्डी असो,श्री गणेश भाऊ चौकसे जिल्हा अध्यक्ष वंचित बहुजन समाज,श्री गणेश भाऊ माने माजी नगराध्यक्ष तथा प्रतिष्ठान चे अध्यक्ष,श्री राम भाऊ बोन्दे अध्यक्ष हनुमान व्यायाम मंडळ,श्री संजय अवताडे,राष्ट्रीय खेळाडू नरेंद्र भाऊ मावळे. महेंद्र पाठक. रमाकांत गलांडे. सुभाष शेळके. विकास चव्हाण.डि आर गलांडे, चंद्र कांत रेठेकर , कल्याणभाऊ गलांडे, प्रसादभाऊ तोडकर, स.ए.मंडळाचे संस्थापक अध्यक्ष देविदास शर्मा, तानाजी घोगरे. शशिकांत वखरे. यांची उपस्थिती होती. यावेळी माही बहुउद्देशीय मंडळ यांना प्रथम क्रमांकाचे ५१ हजार. जय संतोषी माॅ यांना द्वितीय ३१ हजार तर शिवनेरी स्पोटिंग क्लब सुटाळा व आर. सी.सी क्लब भोपाळ यांना तृतीय क्रमांकाचे २१ हजाराचे बक्षीस प्रत्येकी १० हजार ५०० विभागून देण्यात आले. तर मॅन ऑफ दी टुर्नामेंट कुलदीप कुमार माही स्पोटिंग मुर्तिजापूर, यांना प्रत्येकी ५ हजार रुपये तसेच मॅन ऑफ दी डे सुरज झाडे राजु शुभम पातुर्डा व सुरज कुमार शिवनेरी सुटाळा यांना प्रत्येकी २ हजार ५०० रुपयांचे बक्षीस देण्यात आले या प्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रतिष्ठान चे अध्यक्ष गणेश भाऊ माने यांनी केले, खासदार प्रतापराव जाधव, अशोकभाऊ सोनोने,जेष्ठ पत्रकार राजेश राजोरे. यांनी आपले मनोगत व्यक्त केले
या वेळी प्रतिष्ठान चे अध्यक्ष गणेश माने.रमाकांत गलांडे. सुभाष शेळके. विकास चव्हाण, राम बोन्द्रे. नरेंद्र मावळे. डिगांबर गलांडे. महेंद्र पाठक.कल्याण गलांडे, चंद्रकांत रेठेकर,प्रसाद तोडकर, देविदास शर्मा.नागोराव अवतार, स्वप्नील शहा, अरूण भोसले,नरेंद्र पुरोहित. संभाजी राऊत,आनंद पवार, लालाजी सांगळे,तानाजी राऊत, राज किशोर तिवारी,रवी आनंदे, सुनील मोटे, श्याम गलांडे,अनिल मापारी, सुर्यकांत मुंडिवाले,गणेश मानेकर,मुन्ना बोन्र्दे, भगवान निंबाळकर.शैलेश सोले. गजानन मुळीक. सागर मोरे. शुभम मुळीक. गुड्ड गांडाळ.आकाश दळवी. निखिल मोरे. आकाश शिंदे.सुदाम पाडोळे, निखिल घाडगे. सुरज साबळे, बंडु घाडगे. साहेबराव वाशिमकर, अभय जोध, दिनेश उखळकर,बंटी बोन्दे,विक्रांत माने, या स्पर्धेचे पंच म्हणून गजानन राऊत स्पर्धा निरिक्षक, दिनेश चंदेल पंच , विपिन हटकर, अशोक ढिसले,सोनकर सर, चरणसिंग राजपूत राजेश तोडेकर,चरण सिरसाट, वसंता उटाळे, परमेश्वर बोरसे,यांनी काम पाहिले.
प्रथोमपचार डॉ देशमुख. डॉ छाजेड. सप्नील शाह ,दशरथ बोहरा. आदींचे सहकार्य लाभले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसादभाऊ तोडकर व आभार प्रदर्शन रमाकांत जी गलांडे, यांनी केले अशी माहिती श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रिडा व सांस्कृतिक प्रतिष्ठान चे प्रसिद्धी प्रमुख देविदास ऊर्फ मुन्ना शर्मा यांनी दिली