Homeबुलढाणा (घाटावर)
यंदाची शिवजयंती ढोल ताशांच्या गजरात..
बुलढाण्यातील रुद्र ढोल ताशा पथकांची जय्यत तयारी सुरू...
बुलढाणा – आपलं बुलढाणा जिल्हा बातमी- यंदाची शिवजयंती धूमधडाक्यात साजरी करण्यासाठी शिवप्रेमी सज्ज झाले आहेत. शिवप्रेमी सामाजिक, सांस्कृतिक मंडळांकडून मिरवणुका काढून, सामाजिक उपक्रम राबवून, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करून दरवर्षी छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना दिली जाते.मिरवणुकांमध्ये शिवरायांचा थाट साकारण्यात ढोल ताशा पथकांची भूमिका महत्त्वाची असते. त्यामुळे यंदा शिवजयंती जल्लोषात साजरी करण्यासाठी बुलढाण्यातील रुद्र ढोल ताशा पथकांनी जय्यत तयारी सुरू केली आहे.