जय राजे मित्र मंडळ रायपूर कार्यकारिणी निवड
चिखली :-आपलं बुलढाणा जिल्हा बातमी- चिखली तालुक्यातील रायपूर येथे जय राजे मित्र मंडळाची नुकतीच सभा पार पडली. या सभेमध्ये सर्वानुमते मंडळाचे नवनियुक्त अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव व सहसचिव यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. त्याचबरोबर मंडळाची कार्यकारिणीची निवड करण्यात आली.
सविस्तर वृत्त असे की, रायपूर येथे जय राजे मित्र मंडळाच्या वतीने दरवर्षी शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. याही वर्षी जय राजे मित्र मंडळाची तुळजाभवानी मंदिर मंदिरात बैठक पार पडली. या बैठकीमध्ये मंडळाचे नवनियुक्त अध्यक्ष म्हणून तेजराव मुरडकर तर उपाध्यक्ष म्हणून उमेश सिरसाट यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. तसेच सचिव म्हणून पंढरी भोसले तर सहसचिव म्हणून दिपक म्हस्के यांची निवड करण्यात आली. यावेळी गावातील मंडळाचे मावळे मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच शिवजयंती संदर्भात यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली. मंडळाच्या वतीने यावर्षी ऐतिहासिक अशी शिवजयंती निघणार असून यामध्ये पारंपरिक वाद्यांबरोबर मावळे, घोड्यावर शिवछत्रपती, छत्रपती संभाजी महाराज आणि घोड्यावर जिजाऊ त्याचबरोबर तलवारधारी महिला मावळे व पालखी सोहळा, भजन मंडळी, दांडपट्टा, लाठीकाठी, तलवारबाजी, भोवरा खेळणारी मुले आणि मुली असा ऐतिहासिक असा लावा जमा यावेळेस आपल्याला बघायला मिळणार आहे. या अनुषंगाने अतिशय उत्साहात शिवजयंती पार पाडण्याचे ठरले. या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी सर्वांनी या दिमाखदार सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले.