Homeबुलढाणा (घाटावर)

गावागावात वंचित युवा आघाडीच्या शाखांची मजबूत बांधणी

जिल्हाध्यक्ष सतीश पवार यांच्या प्रोत्साहनाने युवकांमध्ये संचारले नवचैतन्य

Spread the love

बुलडाणा :-आपल बुलढाणा जिल्‍हा बातमी- जनसामान्यांच्या समस्या सोडविण्यासाठी वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष सतीश पवार यांनी लढा उभारला आहे. शासन, प्रशासनाला धारेवर धरत आतापर्यंत अनेक प्रश्न मार्गी लावले. जनतेच्या अडचणी सोडवितानाच त्यांनी वंचित बहुजन युवा आघाडी मजबूत करण्यासाठी गाव तिथे वंचित युवा आघाडीच्या शाखांची बांधणी सुरू केली आहे. गावागावातून युवकांचा मिळणारा प्रतिसाद पाहता शाखांचा झंझावात पाहायला मिळत आहे.
वंचित बहुजन युवा आघाडीचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार युवा जिल्हाध्यक्ष सतीश पवार यांनी गावागावात युवकांची मोठी फौज निर्माण करण्यावर भर दिला आहे.जिल्हाभरामध्ये वंचितचा कार्यकर्ता संघटित करणे व गाव तिथे शाखा स्थापन केल्या जात आहेत.भोगावती, तपोवन, सावरगाव डुकरे, वरवंड, धोडप, कोनड, धोत्रा नंदई, पाडळी, दिग्रस, सरंबा, येवता, पळसखेड, मिसाळवाडी, तांदूळवाडी यासह असंख्य गावांमध्ये शाखा स्थापन करण्यात आल्या आहेत. शाखा सुरू करण्यासाठी जिल्हा संघटक बालाभाऊ राऊत, जिल्हा महासचिव अर्जून खरात, जि.प. सर्कलप्रमुख अनिल पारवे, ॲड.कैलास कदम, किरण पवार, समाधान पवार, संतोष कदम, उत्तम पैठणे, सूर्यनंदन जाधव, राहुल वानखेडे, डॉ. राहुल दाभाडे, गौतम गवई, सतीश गुरचवळे, संजय वानखेडे, राहुल साळवे, प्रवीण गरुडे, संजय जाधव यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते सक्रिय सहभाग देत आहेत.
दिवसाच नाही तर रात्री उशिरापर्यंत शाखा अनावरणाचा धडाका उत्साहात सुरू आहे. यावरून सतीश पवार यांनी दिवसरात्र पक्ष कार्यासाठी वाहून घेतल्याचे दिसून येत आहे. ग्रामीण भागातील कार्यकर्ता हा बाबासाहेबांच्या चळवळीशी सच्चा व प्रामाणिक आहे. फटाक्यांच्या आतषबाजीत पवार यांच्यासह पदाधिकाऱ्यांचे स्वागत करण्यात येत आहे. ठिकठिकाणी शाखांच्या उद्घाटनांचा सुरू असलेला धडाका पाहता युवावर्ग झोकून देऊन काम करत आहे. ‘युवकांचा एकच नारा, वंचित युवा आघाडी गावागावात स्थापन करा’, अशी साद युवावर्गाने घातल्याने सतीश पवार यांनीदेखील शाखा स्थापन करण्याचे एकच उद्दिष्ट सध्या समोर ठेवल्याचे दिसून येत आहे.
वंचित बहुजन युवा आघाडीशी युवकच जुळले नाही तर, महिला व पुरुषदेखील बाळासाहेब आंबेडकर आणि आंबेडकर घराण्याची विचारधारा घेऊन जोडल्या जात आहेत. जनसामान्यांची प्रामाणिक सेवा करताना ‘वंचित’मध्ये एक कार्यकर्ता म्हणून काम करण्याचे पूर्ण समाधान मिळते, असे भावोद्गार सतीश पवार यांनी यावेळी काढले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page