जनकल्याण हाच भाजपाचा मूलमंत्र गाँव चलो’ अभियानात दभावासीयांशी मनमोकळा संवाद
बुलढाणा :-आपलं बुलढाणा जिल्हा बातमी- गावागावातील सर्वसामान्य जनतेशी संवाद साधण्यासाठी भाजपाच्या वतीने ‘गाँव चलो’ अभियान सध्या राबवले जात असून या अभियानाअंतर्गत आपल्या बुलडाणा मतदारसंघात आज मोताळा तालुक्यातील दाभा येथे भाजपा युवा मोर्चा बुलडाणा जिल्हा अध्यक्ष विनायक भाग्यवंत यांनी मुक्कामी भेट देऊन ग्रामस्थांशी मनमोकळा संवाद साधला. मागास भागाचा विकास करणे व यातून जनकल्याण साधणे हाच भाजपाचा मूलमंत्र असल्याचे विचार या वेळी व्यक्त केले.यावेळी भाजपा युवा मोर्चा पदाधिकारी व गावाचा वतीने विनायकभाऊ भाग्यवंत यांची भाजप युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष पदी नियुक्ती झाल्या बद्दल सत्कार व अभिनंदन केले
आजच्या भेटीत विविध समाज घटकांच्या समस्या जाणून घेत केंद्र व राज्य शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून जनजीवन कसे प्रगत करता येईल याविषयी दाभावासीयांची मते जाणून घेतली. भाजपा युवा मोर्चा चे पदाधिकारी , कार्यकर्ते, शेतकरी, प्रतिष्ठित नागरिक व युवक या अभियानात सहभागी झाले होते. दाभा येथील गावगाड्यातील पदाधिकारी, महत्त्वाच्या व्यक्ती व समाजघटकांची भेट घेऊन आज संवाद साधला.
यावेळी समाधान गूंड, सदानंद हागे,रामराव पव्हणे ,आत्माराम पव्हणे ,दिपक हूंबड ,सतीश राऊत, गजानन तांगडे ,ऋषिकेश तांगडे ,भागवत पव्हणे,शिवा गुंड,राम तांगडे ,ईश्वर हागे ,अंकुश व्यवहारे, प्रमोद हागे, बाळु पव्हणे ,डींगाबर कचोरे ,संजू सुरगडे, विकास बावस्कर, विष्णू सपकाळ ,किरन हूंबड ,अविनाश पाटील, स्वानंद पव्हणे , गोंवीदा व्यवहारे ,अमोल हागे ,सागर सुरशे ,अविनाश कचोरे , सागर चव्हाण ,विवेक दिंडे,अनिकेत गवळी,मंगेश गाडेकर,अमोल पाटील,संदीप पाटील जाधव,नितीन शेळके,शिवाजी होनाळे,प्रसाद मस्के यांच्यासह भाजपा युवा मोर्चा पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.