युवतीची छेडखानी करणाऱ्या ड्रायव्हिंग स्कूल चालकास महिलांनी बदडले
शेगाव-आपलं बुलढाणा जिल्हा बातमी- फोर व्हीलर गाडीची ड्रायव्हिंग शिकण्यासाठी गेलेल्या एका युवतीची ड्रायव्हिंग स्कूल चालकाने छेडखानी केल्याने सदर युवतीसह तिच्या नातेवाईकांनी त्याला यथेच्छ बदडले. चप्पलांचा हार त्याचे गळ्यात टाकून भर चौकात आणून धिंड काढली. एवढ्यावरच ना थांबता पोलीस स्टेशनमध्ये आणून त्या विरोधात तक्रार सुद्धा दाखल केली. मात्र काहींनी मध्यस्थी केल्यावर सदर प्रकरण आपसात घेण्याचे प्रयत्न करण्यात आले. मात्र यात अपयश आले अखेर १० दिवसांनी पीडित युवतीच्या तक्रारीवरून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना स्थानिक जगदंबा नगर मधील श्री गुरुदेव ड्रायव्हींग स्कुलमध्ये ३ फेब्रुवारी रोजी घडली.
शहरातील जगदंबा नगर स्थित ज्ञानेश्वर कुकडे यांच्या श्री गुरुदेव मोटर ड्रायव्हिंग स्कूलमध्ये शहरातील जिजामाता नगरमध्येराहणारी एका युवतीने फोर व्हीलरचे ड्रायव्हिंग शिकण्याकरिता क्लास लावला होता. तिला स्कूलच्या चालकाने ज्ञानेश्वर कुकडे यांनी त्याच्याकडे असलेली होंडाई कंपनीची फोर व्हीलर गाडी शिकवत असताना जवळीक साधण्याचा प्रयत्न करत होता. वाईट उद्देशाने नको त्या ठिकाणी विनयभंग करत असे.त्याला सदर युवतीने समजावून सांगितले. मात्र तो ऐकत नव्हता ३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५.३० वाजता सदर युवती ड्रायव्हिंग क्लास समोरून जात असताना त्याने तिचा पाठलाग व हातवारे केले. नको त्या ठिकाणी स्पर्श केला व तु मला आवडतेस असे सांगत विनयभंग केला. अशी तक्रार पीडित युवतीने पो स्टे शेगाव शहर येथे दिली वरून पोलिसांनी १३ फेब्रुवारी रोजी आरोपी ज्ञानेश्वर विठल कुकडे यांचे विरुद्ध कलम ३५४अ, ३५४ड, ५०९ भांदवीनुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोहेकॉ. संजय करूटले करत आहेत.