बिबट्याच्या हल्ल्यात 52 वर्षीय मजुर ठार
चिखली-आपलं बुलढाणा जिल्हा बातमी- तालुक्यातील उदयनगर येथे हरवलेली गाय शोधण्यासाठी जंगलात गेलेल्या ५२ वर्षीय इसमावर बिबट्याने हल्ला करून ठार मारले. सदर घटना ज्ञानगंगा अभयारण्यातील माटरगाव परिसरात १३ फेब्रुवारी रोजी दुपारच्या सुमारासह उघडकीस आली. याबाबत हकीकत अशी की, माटरगाव गेरू येथील बाजीराव मांगीलाल चव्हाण वय ५२ वर्ष मोल मजुरी करून उदरनिर्वाह करतात. यांची गाय जंगलात हरवली होती. ती शोधण्यासाठी बाजीराव चव्हाण १२ फेब्रुवारी रोजी दुपारच्या सुमारास गावापासून जवळ असलेल्या ज्ञानगंगा अभयारण्यात गेले होते ते सायंकाळ झाली तरी घरी परत आले नाही. म्हणून गावातील इतरांनी रात्री १ वाजेपर्यंत जंगलात त्यांचा शोध घेतला. परंतु ते मिळून आले नाही. म्हणून पुन्हा १३ फेब्रुवारी रोजी सकाळी ज्ञानगंगा अभयारण्यात गावातील ग्रामस्थांनी जाऊन शोध घेतला असता ज्ञानगंगा धरणाचे बाजूने जुनी आमराई म्हणून ओळखल्या जात असलेल्या परिसरात शोधणाऱ्यांना रस्त्यातून काहीतरी फरपटत नेल्याचे दिसून आले.
एका काटेरी जाळीत बाजीराव चव्हाण यांचा मृतदेह दिसून आला. तर बिबट्याने मानेला तसेच पोटातील काही भाग खाल्ल्याचे दिसून आल्याचे प्रत्यक्ष दर्शनींनी सांगितले. सदर घटनेची माहिती मिळताच वन्यजीव, वन विभागाचे बोबडे खामगाव, राठोड बुलढाणा, अकोला येथील अधिकारी सह आदींनी घटनास्थळ गाठून माटरगावचे सरपंच अशोक जगताप, पोलीस पाटील, तंटामुक्ती समिती अध्यक्ष व आदी ग्रामस्थांच्या उपस्थित पंचनामा करून प्रेत उत्तरीय तपासणीसाठी खामगाव सामान्य रुग्णालयात दाखल केले. सदर घटनेची फिर्याद देण्यासाठी रात्री ८ वाजेच्या सुमारास हिवरखेड पोलिस स्टेशन ही गाठले. गाय शोधण्यासाठी गेलेल्या इसमावर बिबट्याने हल्ला करून ठार मारले.सदर घटनेमुळे माटरगाव परिसरात हळहळ व्यक्त होत असून कुटुंबाचा कर्ता पुरुष गेल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगरच कोसळला आहे.करिता शासनाकडून भरीव मदत मिळावी, अशी आले म्हणून त्या सुगावाद्वारे पाहत पाहत जात असतांना मागणी माटरगाव ग्रामस्थ करीत आहेत