भ्रष्टाचार निर्मुलन दक्षता समितीकडे तक्रार दाखल करण्याचे आवाहन
बुलढाणा:- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी- जिल्हास्तरीय भ्रष्टाचार निर्मुलन दक्षता समिती सभा आयोजित करण्यात येणार आहे. यात नागरिकांनी तक्रार दाखल करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.शासनाच्या निर्णयानुसार शासकीय कामामध्ये विलंब, गैरव्यवहार व अकार्यक्षमता व इतर कारणाने होणाऱ्या भष्ट्राचाराचे तक्रारीची दखल घेण्याकरीता बुलडाणा जिल्हा परिषद अंतर्गत जिल्हास्तरावरील खाते प्रमुख स्तरावरील विभागनिहाय दक्षता समिती गठीत करण्यात आली आहे.नागरिकांनी आपल्या तक्रारी संबंधित विभाग प्रमुख यांच्याकडे सादर करव्यात. सदर तक्रारीबाबत तक्रारकर्त्याचे समाधान झाले नसल्यास तक्रारीच्या अहवालासह जिल्हास्तरीय दक्षता समितीमध्ये तक्रार दाखल करावी, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांनी केले आहे.