Homeबुलढाणा घाटाखाली

जेष्ठ पत्रकार निखिल वागळेंवरील हल्ल्याचे मोताळ्यात पडसाद..!

Spread the love

मोताळा- आपलं बुलढाणा जिल्‍हा बातमी :- जेष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्यावर पुणे येथे झालेल्या हल्ल्याचा मोताळा प्रेस टाइम्स व फुले शाहू आंबेडकरी विचारधारा जोपासणाऱ्या कार्यकर्त्यांनी मंगळवार (ता.१३) मोताळा येथे निदर्शने करून निषेध नोंदविला. यावेळी तहसीलदारांमार्फत राज्याचे गृहमंत्री यांना निवेदन देण्यात आले आहे. पुणे येथे पुरोगामी संघटनांकडून ९ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आलेल्या ” निर्भय बनो ” सभेला जाताना पत्रकार निखिल वागळे यांच्या गाडीवर काही समाजकंटकांनी हल्ला चढवला.दरम्यान मोताळा प्रेस टाइम्स तसेच फुले,शाहू,आंबेडकरी विचारधारा जोपासणारे विविध राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी दंडांवर काळ्या फिती बांधून या हल्ल्याचा निषेध नोंदविला.

यावेळी मोताळा बस स्थानक चौकात निदर्शने करण्यात आली.सदर हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.निवेदनावर मोताळा प्रेस टाइम्सचे अध्यक्ष सॅंडी मेढे,काॅंग्रेस नेते गजानन मामलकर,समतेचे निळे वादळ मोताळा तालुकाध्यक्ष अरुणभाऊ डोंगरे,राष्ट्रवादी विधानसभा अध्यक्ष डॉ.शरद काळे,वंचित जिल्हा नेते प्रशांतभाऊ वाघोदे,जगन उमाळे,सुधाकर बोरसे,अनिल खराटे,कैलास खराटे,सादिक शेख,शाहीद कुरेशी,अमर कुळे,वैभव वानखेडे,वसंत जगताप,तुळशीराम नाईक,मिलिंद अहिरे,जितु खराटे,रोशन गायकवाड,अमोल डोंगरे,सतीश नरवाडे,महेंद्र मेढे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.दरम्यान बोराखेडीचे ठाणेदार सारंग नवलकार यांच्या मार्गदर्शनात पीएसआय विजयकुमार घुले,पोहेकाॅं नंदकिशोर धांडे,पोकाॅं मंगेश पवार व सहकाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता..!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page