अवैध रेती वाहतूक करणाऱ्या वाहनावर स्थानिक गुन्हे शाखा पथकाची धडाकेबाज कारवाई
लोणार- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी- (राहुल सरदार)- मराठवाड्यातून विदर्भात अवैधरीत्या रेतीची वाहतूक करणाऱ्या वाहनावर बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धडाकेबाज कारवाई करत रेतीमाफीच्या मुसक्या आवळ्ल्या याबाबत सविस्तर वृत्त असे की मराठवाड्यातून विदर्भात दिवस रात्र अवैधरित्या चोरट्या मार्गाने रेतीची वाहतूक होत असल्याची. गोपनी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोहे का राजेंद्र अंभोरे पो का अमोल शेजोळ पो का जयंत बोचे यांना मिळाली त्यानुसार सदर पथकाने लोणार मेहेकर रस्त्यावरील श्रद्धा पेट्रोल पंप जवळ दिनांक 12 फेब्रुवारी 2024 रोजी रात्री नऊ वाजे दरम्यान सापळा रचला व त्यामध्ये मराठवाड्यातून टाकळखोपा तालुका मंठा जिल्हा जालना येथील आरोपी योगेश दत्ता वाघ हा पिवळ्या रंगाचे लेलँड वाहन क्रमांक एम एच 21 बीजी 7771
ने अवैध रेती वाहतूक करताना आढळून आला वाहनचालकाकडे रेती बाबत चौकशी केली असता त्याच्याकडे कुठलाही रेतीचा परवाना नव्हता त्यामुळे सदर वाहन लोणार पोलीस स्टेशनला जप्त करत लोणार पोलीस स्टेशनला कलम 379 भादवी सह कलम 21 (1)(2) गौण खनिज अधिनियम 1957 नुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास लोणार पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक निमिष मेहेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहे का संतोष चव्हाण पो का अनिल शिंदे गजानन डोईफोडे ज्ञानेश्वर निकस करीत असून स्थानिक गुन्हे शाखेच्या या पथकाने केलेल्या कारवाई.चे सर्व स्तरातून कौतुक होत असून या धडक कारवाईमुळे आयुर्वेद येथे वाहतूक करणाऱ्याचे धाबे दणाणले आहे