शिवालय ‘बुलढाणा येथे पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना शहर भाजपच्या वतीने श्रद्धांजली …..
बुलढाणा -आपलं बुलढाणा जिल्हा बातमी:- 14 फेब्रुवारी सन 2019 रोजी झालेल्या या आतंकी हल्ल्यात 40 जवानांना वीरमरन आले होते.जम्मू-श्रीनगर या राष्ट्रीय महामार्गावर 78 बसेस मधून एकूण 2500 सीआरपीएफ जवानांचा ताफा हा रस्त्याने चालला असता अचानक झालेल्या आतंकी भ्याड हल्ल्यात आपले भारताचे देशाचे 40 जवान शहीद झाले.
या अनुषंगाने आज शहर भाजपाच्या वतीने 14 फेब्रुवारी हा काळा दिवस पाळून या वीरमरण आलेल्या शहीद जवानांना आदरांजली /श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.यावेळी झालेल्या घटनेबाबत 14 फेब्रुवारी हा काळा दिवस म्हणून बुलढाणा शहराध्यक्ष श्री अनंता शिंदे प्रकाश टाकला या श्रद्धांजलीपर कार्यक्रमात कामगार मोर्चाचे महाराष्ट्र सचिव श्री विश्रामजी पवार,
कामगार जिल्हाध्यक्ष श्री दत्ताजी शिंदे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष श्री दत्ताजी पाटील,बुलढाणा शहराध्यक्ष अनंता शिंदे महिला मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष सौ अलकाताई पाठक ,जिल्हा सरचिटणीस उषाताई पवार, महिला मोर्चा बुलढाणा शहराध्यक्ष वर्षाताई पाथरकर, योगिता बढे, मीनाताई बिल्लारी, राधाबाई सोनवणे ,अर्चना कानडजे ,कस्तुराबाई चव्हाण, शांताबाई चव्हाण ,उत्तम शेवाळे ,रघुनाथ जाधव, आणि असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते