अवैध रेती उत्खनन करणाऱ्या तीन बोटी आणि इतर साहित्य जागेवरच केले नष्ट
सिंदखेडराजा – आपलं बुलढाणा जिल्हा बातमी- अनिल दराडे- अवैध रेती उत्खनन थांबविण्यासाठी महसूल विभागाने जोरदार मोहीम हाती घेतली असून उपविभागीय अधिकारी समाधान गायकवाड यांच्या नेतृत्वात धाडसी कारवाई करत रेती उत्खनन करणाऱ्या तीन बोटी फायबर सेक्शन पाईप इंजिन व इतर साहित्य जप्त करून एनडीआरएफ च्या पथकामार्फत जागेवरच नष्ट केल्याने रेती माफियामध्ये दहशत पसरली आहे दरम्यान अवैध रेती उत्खनन व वाहतूक होऊ नये यासाठी महसूल नायब तहसीलदार डॉ आसमा मुजावर आणि त्यांचे पथक अवैध रेती वाहतुकीवर करडी नजर ठेवत असून अवैध रेती वाहतुकीला मोठा चाप बसणार आहे
याबाबत माहिती अशी की देउळगावराजा तालुक्यामध्ये अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुक होत असल्याची माहिती मिळताच जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय अधिकारी, समाधान गायकवाड देउळगावराजा तहसीलदार वैशाली डोंगरजाळ व पथकातील, महसूल नायब तहसीलदार डॉ अस्मा मुजावर आणि मंडळ अधिकारी व तलाठी यांच्यासह मेहुणाराजा शिवारामध्ये खडकपूर्णा प्रकल्प क्षेत्रामध्ये दिनांक 08 ला अवैध रेती उपसा करण्यासाठी वापरण्यात येणारी 1 बोट, फायबर, सेक्शन पाईप जोडणी केलेले प्रत्येकी 100 फुट जोडणी केलेले एकुण 03 नग तसेच, दिनांक12 ला अवैध रेती उपसा करण्यासाठी वापरण्यात येणारी 1 बोट, फायबर, इंजीन, सेक्शन पाईप जोडणी केलेले, आणि दिनांक-13.02.2024 रोजी अवैध रेती उपसा करण्यासाठी वापरण्यात येणारी 1 बोट, फायबर, सेक्शन पाईप जोडणी आदी साहित्य जप्त करून एनडीआरएफ चे पथक बोलावून त्यांच्यामार्फत सदर अवैध रेती उपसा करणारे बोटीसह इतर साहित्य जागेवरच नष्ट करण्यात आले यापुढेही बोटीच्या सहाय्याने अवैध रेती उत्खननचा प्रयत्न झाल्यास NDRF चे पथकाच्या मार्फत कारवाई करण्यात येईल असा इशारा उपविभागीय अधिकारी समाधान गायकवाड यांनी दिला
असल्याने रेती माफियामध्ये या कारवाईमुळे चांगली दहशत पसरली आहे