संदीप शेळके यांच्या परिवर्तन यात्रेला शेगावात उत्कृष्ट प्रतिसाद
खासदारकीची संधी मिळाल्यास जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करू - संदीप शेळके
शेगाव:- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी- वन बुलढाणा मिशनच्या परिवर्तन रथ यात्रेला शेगावात उदंड प्रतिसाद मिळाला आहे. शेगाव तालुक्यातील अनेक गावात सभा गाजल्या असून अनेकांनी बुलडाणा जिल्ह्याच्या खासदारकीसाठी संसदेत पाठवायची शपथ संदीप शेळके यांना दिली आहे.
अवकाळी ने खचलेल्या शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचून त्यांना धिर दिला तसेच शासनाने शेतकऱ्यांना स्पेशल पॅकेज जाहीर करून त्यांना सन्मानाने जगता येईल असेही धोरण आखावे अशीही मागणी केली आहे. तसेच जानोरी येथील हाऊस फुल जाहीर सभा संदीप शेळके यांच्या रोखठोक भाषणांनी गाजली आक्रमकपणे बोलताना संदीपदादांनी शेतकरी, कष्टकरी अन बेरोजगार युवकांच्या व्यथा, वेदना, समस्यांना तोंड फोडतानाच जिल्ह्यातील नेत्यांवर टीकेचा आसूड उगारला होता. जिल्ह्यातील शेतकरी चौफेर संकटात अडकला आहे.
यामुळे जगाचा पोशिंदा समजल्या जाणाऱ्या बळीराजाच्या हाल अपेष्ठांना पारावार उरला नाही असे भीषण चित्र असताना जिल्ह्याचे खासदार संसदेत तर आमदार विधानसभेत मूग गिळून बसतात. मौनव्रत धारण करून त्यावर आवाज उठवत अशा विविध टीकेचा स्त्रोत संदीप शेळके यांनी बोलून दाखवला होता.हे चित्र बदलण्यासाठी परिवर्तन ही काळाची गरज ठरली आहे. यामध्ये मला खासदारकीची संधी दिली तर जिल्ह्याचा चौफेर विकास करण्यासाठी आपण प्रयत्नांची पराकाष्टा करू अशी ग्वाही त्यांनी दिली. यावेळी गांधी चौक, शिवनेरी चौक अश्या विविध सभेंना नागरिकांनी उत्स्पूर्त प्रतिसाद देत आगामी लोकसभा निवडणुकीत संदीप शेळके यांना लोकसभेवर पाठवायचे बोलून दाखवले आहे. शेळके यांच्या परिवर्तन यात्रेला शेगावात उत्कृष्ट प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले.