Homeबुलढाणा (घाटावर)

डाक विभागातर्फे महामेळावा उत्साहात पडला पार

Spread the love

बुलढाणा:- आपलं बुलढाणा जिल्‍हा बातमी- डाक विभागातर्फे या आर्थिक वर्षात ‘नया साल, नया जोश’ हा उपक्रम दि. 29 जानेवारी 2024 ते 29 फेब्रुवारी 2024 पर्यंत राबविण्यात येत आहे. नागरिकांना डाक विभागाच्या सेवांचा लाभ मिळावा, तसेच वित्तीय समावेशन व्हावे, यासाठी बुलडाणा येथील डाक विभागात शनिवारी, दि. 17 फेब्रुवारी रोजी डाक महामेळावा पार पडला.

यावेळी सहायक डाक निर्देशक दिलीप खाडे, सहाय्यक अधिक्षक डाकघर जयंत दाऊ, डाक अधिक्षक गणेश अंभोरे उपस्थित होते.श्री. खाडे म्हणाले, डाक विभाग आधुनिकीकरणाची कास धरत आहे. तसेच सर्व सेवा नागरिकांपर्यंत पोहोचत आहे. तसेच श्री. दाऊ यांनी आजच्या संगणकाच्या युगातही डाक विभागाने आपली विश्वासार्हता जपल्याचे सांगितले. श्री. आंभोरे यांनी डाक विभागाच्या योजनांची माहिती दिली. या योजना तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहचविण्याचे आवाहन केले. तसेच भविष्यातही डाक विभाग जनसामान्यांना विविध सेवा प्रदान करण्यासाठी कटीबद्ध राहिल, असे आश्वासन दिले. प्रल्हाद कचरे यांनी सूत्रसंचालन केले.या योजना नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी बुलडाणा डाक विभागाने दि. 29 जानेवारी 2024 पासून दि. 16 फेब्रुवारी 2024 पर्यंत बचत व तत्सम 42 हजारापेक्षा जास्त खाती काढून महाराष्ट्र सर्कलमध्ये प्रथम स्थान प्राप्त केले आहे.

डाक विभागातर्फे ग्राह‌कांसाठी विविध लोकोपयोगी योजना राबविल्या जातात. त्यात नागरिकांचे वित्तीय समावेशन करण्याच्या उद्देशाने भारतीय डाक विभागाद्वारे बचत बँक, आवर्ती जमा, सावधि जमा, महिला सन्मान, सुकन्या, किसान विकास पत्र, राष्ट्रीय बचत पत्र, ज्येष्ठ नागरिक बचत योजना आदी योजना पुरविल्या जाते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page