बुलडाणा शहरात विश्वाचे निर्माते भगवान श्री विश्वकर्मा यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी…
बुलढाणा:- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी:- सृष्टीचे निर्माते भगवान विश्वकर्मा यांची जयंती आज दि 22 फेब्रुवारी 2024 रोजी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे.ही जयंती श्री.सद्गुरु दामोदर महाराज मंदिर भगीरथ कारखान्याजवळ चिखली रोड येथे साजरी करण्यात आली आहे.
भगवान विश्वकर्मा देवांचे वास्तुकला तज्ञ आहेत. त्यांनी भगवान श्रीकृष्णासाठी द्वारका,पांडवासाठी हस्तिनापूर व रावणासाठी सोन्याची लंका तयार केली. या नगरांच्या रचनेत, सौंदर्य, अचुकता व सुखसोयी यांचा मिलाप होता. ते वास्तुशास्त्राचे पहिले प्रणेते आहेत.
विविध कार्यक्रमाने जयंती ची सुरुवात करण्यात आलेली आहे. सर्वप्रथम ज.न.म प्रवचनकार नाणीजधाम राजू महाराज सनान्से यांच्या प्रवचना पासून सुरुवात करण्यात आली. त्यांनी सांगितले की जोपर्यंत आपल्यातला अहंकार जात नाही तोपर्यंत परमेश्वराची प्राप्ती होणार नाही परमेश्वराची प्राप्ती व्हावी असे वाटत असेल तर देवासारखे वागणे शिकले. परोपकार दया क्षमा अंगी बाळगा. तुम्ही जगा आणि दुसऱ्याला जगवा स्वप्नात सुद्धा कोणाचे वाईट चीतू नका मग परमेश्वर हा संभव आपल्याला मदत करेल असे मार्गदर्शन यावेळी त्यांनी आपल्या प्रवचनांमधून दिले आहे. त्यानंतर भगवान श्री विश्वकर्मा यांच्या प्रतिमेचे पूजन करून सर्व समाज बांधवांच्या वतीने आरती करण्यात आली. व नंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले आहे.
सुतार समाज बांधव तसेच महिला मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.