निर्मिती क्षेत्रांतील प्रत्येक कारागीर विश्वकर्मा या व्यापक संकल्पनेतून विश्वकर्मा जयंती संपन्न
निर्मिती क्षेत्रातील प्रत्येक कारागीर म्हणजे विश्वकर्मा --सतीश शिंदे
उपस्थितांना मार्गदर्शन प्रसंगी महाव्यवस्थापक सुनिल पाटील
उदयोजक घडविण्यासाठी जिल्हा उदयोग केंद्राची मदत – महाव्यवस्थापक सुनिल पाटील
हिवरा आश्रम – आपलं बुलढाणा जिल्हा बातमी :- उदयोग उभारण्यासाठी आर्थिक पाठबळ देण्याचे काम जिल्हा उदयोग केंद्र करते. व्यक्तीला उदयोग उभारून आर्थिक प्रगती साधता यावी यासाठी शासनाच्या विविध कल्याणकारी योजना आहे. जिल्हा उदयोग कार्यालयात क्यूआर कोडच्या माध्यमातून योजनाची माहिती प्राप्त होते. आर्थिक उन्नतीसाठी उदयोगाची कास धरा. उदयोजक घडविण्यासाठी जिल्हा उदयोग केंद्राची मदत होते असे विचार बुलडाणा जिल्हा उदयोग केंद्राचे महाव्यवस्थापक सुनिल पाटील यांनी बुधवारी ता. २१ रोजी बोलतांना व्यक्त केले. चिखली येथील संत खटकेश्वर महाराज संस्थान येथे चिखली तालुका उत्सव समितीने आयोजित प्रभू विश्वकर्मा जयंती प्रसंगी मार्गदर्शन प्रसंगी ते बोलत होते.
जेष्ट कामगार नेते सतिष शिंदे यांच्या संकल्पनेतून निर्मिती क्षेत्रांत काम करणारा प्रत्येक कारागीर म्हणजेच विश्वकर्मा या व्यापक संकल्पनेतून विश्वकर्मा जयंती साजरी करण्यात आली. यावेळी विविध क्षेत्रातील कारागीरांना त्यांच्या कार्याबद्दल विश्वकर्मा पुरस्कार उपस्थित मान्यवरांच्या देण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून अत्रिनंदन सिमेंट प्रोडक्टचे संचालक विजयकुमार मेहत्रे, तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून बुलडाणाचे जिल्हा उद्योग केंद्राचे सुनील पाटील तर प्रमुख पाहूणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष संजय गाडेकर, गाव माझाचे संपादक पवन वानखेडे, पत्रकार सुधीर चेक, जेष्ठ कामगार नेते सतीष शिंदे, ॲड वृषाली ताई बोंद्रे, गाव माझा च्या महिला प्रमुख अष्टगाथा मॅडम, बचत गटाच्या सीमा मॅडम, मेघा जाधव, मार्गदर्शक,श्रीराम वानखडे, गजानन जवरकर, उत्सव समिती संतोष जगताप, बंडू कदम, राहुल इंगळे, समाधान, भोलवनकर तथा आदि उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरूवात प्रभू विश्वकर्मा यांच्या प्रतिमेचे पूजन व दिप प्रज्वलनाने झाली. सकाळी प्रभू विश्वकर्मा यांचे विधीवत मंत्रोच्चारात पूजन करण्यात आले. यावेळी उपस्थित सुतार समाज बांधवांनी मोटरसायकल रॅली काढण्यात आली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राहुल इंगळे गणेश मुर्हेकर ,विजय कुठे, दिगंबर दुतोंडे, गोपाल खोलगडे, विजय जाधव, समाधान भोलवनकर, उमेश मिस्त्री, गुलाब मिस्त्री राहुल शिंदे, विजय सांगळे, भागवत तांगडे, राम काळे, गजानन खवसे, गजानन सुरोशे यांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कामगार नेते सतिष शिंदे तर सूत्रसंचालन अनंत राऊत यांनी तर आभार प्रदर्शन पत्रकार संतोष थोरहाते यांनी मानले.
विश्वकर्मा जयंतीतून सामाजिक ऐक्याचा संदेश
चिखली येथे विविध क्षेत्रातील कारागीर एकत्रित येत विश्वकर्मा जयंती साजरी करून सामाजिक ऐकतेचा संदेश दिली. आपण सर्व एक आहोत या व्यापक संकल्पनेला मुर्तरूप दिले. विश्वकर्मा म्हणजे निर्मिती करणारा प्रत्येक कारागीर होय. असेही जेष्ठ कारागीर नेते सतिष शिंदे यांनी बोलतांना सांगितले.