प्राथमिक आरोग्य केंद्र अत्री खेडेकर येथे 91 टक्के पल्स पोलिओ मोहीम यशस्वी
चिखली- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी-तालुक्यातील मौजे अंत्रीखेडेकर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथील डॉक्टर ठाकरे मॅडम यांच्या प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी व उपकेंद्र येथे कॅम्प लावून प्रत्येक पाच वर्षाखाली बाळाला पल्स पोलिओचा डोस देण्यात आला त्यामध्ये वाडी वस्तीत तांडा या ठिकाणी स्वतः डॉक्टर ठाकरे मॅडम यांनी जाऊन लहान बालकांना पोलिओ डोस दिला तसेच त्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून सांगितले त्यामुळे वाडी वस्तीवरील जे मुले शिक्षणापासून वंचित आहे त्यांना पॉलिओ विषय माहिती दिली आहे या पूर्वी सुद्धा पोलिओ विषयी जनजागृती करुन माहिती दिली आहे पोलिओ चे दुष्परिणाम काय असतात व घेतल्यामुळे काय होते या वर सविस्तर चर्चा करण्यात आली त्या वेळेस प्राथमिक आरोग्य केंद्राचे काही सहकारी हजर होते वाढी वस्तीवरील तसेच तांडा वस्तीवरील मुलानी पोलिओचा डोस घेतल्यामुळेच 91 टक्के ध्येय साधता करता आले अशी माहिती प्राथमिक आरोग्य केंद्र चे मेडिकल ऑफिसर डॉक्टर ठाकरे मॅडम यांनी माहिती दिली आहे जे लाभार्थी बाकी आहेत त्यांना लवकरच पुढील कार्यक्रमांमध्ये त्यांना पोलीओ देण्यात येईल उच्च प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर ठाकरे मॅडम यांचे नियोजन व त्या कार्यक्रमामुळेच हे ध्येय साध्य झाले त्यांच्यासोबत एक मोबाईल टीम व प्रत्येक कर्मचारी हा आपल्या बुधवार सक्रिय होता त्यांनी अंगणवाडी सेविका यांनी सुद्धा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कर्मचाऱ्यांना मोलाचे सहकार्य केले आहे