वर्दडी ग्रामपंचायतच्या सरपंच यांच्या मनमानी विरोधात आमरण उपोषण
सिंदखेडराजा- अनिल दराडे- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी:- वर्दडी ग्रामपंचायत चे सरपंच पती यांनी ग्रामपंचायतीमध्ये हस्तक्षेप करत असल्याप्रकरणी त्यांच्या वर कार्यवाही करण्यात यावी विरोधी पार्टी चे आहात म्हणून ग्रामपंचायत सदस्य सह नागरिकांना वेठीस धरून कुठलेच काम न होऊ देणे दादागिरी करणे , सरपंच व सरपंचपती यांचे वर कारवाई करण्यात यावी,
14 व्या वित्त आयोगाचे कामे मनमानी पद्धतीने ग्रामसभा न घेता जनतेचे हित न बघता दुसरीकडेच करणार अशी उद्धट भाषा वापरून निधी तसाच पडू देणे. ग्रामस्थांना वेळेवर कुठलाच गाव नमुना 8 आ न देणे, घरकुल शेड गोठा शौचालयाचा दाखला घरपट्टी पाणी पट्टी ,साठी,वारंवार नागरिकांना चकरा मारायला लावणे, व तरीही कुठलीच पावती न देणे निधी तसेच पडू देणे ग्रामस्थांना वेळेवर कुठलीच पावती न देणे, ग्रामपंचायत सदस्य यांचे घरकुल प्रस्तावावर फोटो असेल की सरपंच नागरिकांना घरकुलाच्या सभेचे फोटो विरोधी पार्टी सदस्य का घेतली म्हणून माझा फोटो असला तरच तुमची फाईल मंजूर होईल अनेक समस्यासाठी सरपंच यांच्यावरती कायदेशीर कारवाई करण्यात यावी घरकुल बांधकाम 7/12 वर करण्यात यावें पाणी आदी मागण्यासाठी सिंदखेड राजा पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषनास सुरुवात केली आहे यामधे ग्रामपंचायत सदस्य यांच्या सह नागरिकांनी पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषणास प्रारंभ केला आहे या उपोषण मधे राधेराव देविदास सोनकांबळे ,सोनाली सोनकांबळे, जगन्नाथ दशरथ आटोळे ,त्र्यंबक अरुण आटोळे, आदींनी उपोषण सुरू करण्यात आला आहे या उपोषणास वंचित नेते भाई दिलीप खरात माजी आमदार तोताराम कायंदे, माजी आमदार डॉ शशिकांत खेडेकर,भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ गणेश मांटे, वंचित चे तालुकाध्यक्ष मधुकर शिंदे आदींनी भेट दिली