Homeबुलढाणा घाटाखाली

तहसीलदार पिलारेंच्या बदलीसाठी तिसऱ्या दिवशीही उपोषण सुरुच..

Spread the love

मोताळा :- आपलं बुलढाणा जिल्‍हा बातमी-   तहसीलदारांच्या मनमानी कारभारामुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहे.नागरिकांच्या कामांचा खोळंबा झाला आहे.त्यांच्या मनमानी कारभाराची चौकशी करून त्यांची मोताळा येथुन बदली करण्याच्या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते संतोष मेढे यांनी तहसील कार्यालयासमोर ४ मार्च रोजी सुरू केलेल्या उपोषणाची दखल न घेण्यात आल्याने ते बुधवारी तिसऱ्या दिवशीही सुरूच होते.अमरावती विभागीय आयुक्तांना दिलेल्या निवेदनात संतोष मेढे यांनी आरोप केला आहे की,तहसीलदार हे आठवड्यातून तीनचार दिवस कार्यालयात येतात.दुपारी २ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत ते मोबाईलवर बोलत असल्याने नागरिक,कार्यालयीन कर्मचारी ताटकळत उभे असतात.त्यांची उद्धटपणाची भाषा असून ते मगरूरपणे वागत आहेत.ते पैसे घेतल्याशिवाय कामच करत नाही.पाच हजारांच्या कामासाठी ते २५ हजार रूपये मागतात.पैसे नाही दिले तर ते प्रकरणात त्रुटी काढत असल्याने सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाल्याचे निवेदणात म्हटले असून त्यांच्या मनमानी कारभाराची सखोल चौकशी करून त्यांची तात्काळ बदली करण्याच्या मागणीसाठी मेढे यांनी उपोषण सुरू केले असून ते बुधवार ६ मार्च रोजी तिसऱ्या दिवशीही सुरूच होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page