चिखली तालुक्यात लाईनमन दिवस मोठ्या उत्साहात साजरा ,रक्तदान शिबीर हि झाले संपन्न…
चिखली (आपलं बुलढाणा जिल्हा बातमी) – सोमवार दि. 04 -मार्च – 2024 रोजी उपविभाग चिखली येथे लाईनमन दिवस साजरा करण्यात आला. गेल्या वर्षी पासून जागतिक लाईनमन दिवसाची सुरवात झाली. त्यानिमित्ताने विज क्षेत्रात कार्यरत असलेले सर्व लाईन मन यांचा या दिवशी सत्कार करण्यात आला. उपविभाग चिखली येथे लाईनमन दिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये सकाळी 9.00 ते दुपारी 01.00 वाजेपर्यंत रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. यामध्ये जवळपास 40 कर्मचाऱ्यांनी रक्तदान दिले. विशेष म्हणजे चिखली चे कर्तव्यदक्ष तहसीलदार श्री संतोष काकडे यांनी सुद्धा या ठिकाणी शुभेच्या रुपी भेट देऊन स्वतः रक्तदान दिले. तहसीलदार साहेब यांची रक्तदान करण्याची 35 वी वेळ होती हे विशेष. त्यानंतर सर्व कर्मचाऱ्यांना 01.00 ते 02.00 या वेळेत T T चे लसीकरण करण्यात आले. या कार्यक्रमामध्ये अध्यक्षीय भाषण उपकार्यकारी अभियंता श्री वक्ते साहेब यांनी केले व अधीक्षक अभियंता बुलडाणा श्री कटके साहेब, कार्यकारी अभियंता बुलडाणा श्री चव्हाण साहेब, श्री बांबल साहेब बुलडाणा, श्री कदम साहेब बुलडाणा, श्री पंधारे साहेब बुलडाणा,यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यानंतर सर्व कर्मचाऱ्यांना T&P चे वाटप करण्यात आले. त्यामध्ये विशेष योगदान चिखली चे नामांकित कंत्राटदार श्री रमेश खेडेकर, श्री गजानन जाधव,श्री अमोल गायकवाड व सेंटर चे सर्व सहाय्यक अभियंता श्री बाविस्कर, श्री सवडतकर, श्री गायकवाड, श्री खाडे, श्री जाधव, श्री पडघान, श्री शर्मा यांनी दिले.
त्यानंतर कर्मचार्यांचे मनोरंजन होण्यासाठी ऑर्केस्ट्रा चे सुद्धा आयोजन करण्यात आले होते. अशा पद्धतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करून लाईनमन दिवस साजरा करण्यात आला.हा कार्यक्रम यशस्वी रित्या पार पाडण्यासाठी श्री गणेश शिराळे, श्री दिपक सावळे, श्री गणेश सोनुने, श्री राम वानखेडे, श्री प्रशांत रिंढे, श्री नंदू लहाने ई. कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.