Homeक्राईम डायरीबुलढाणा (घाटावर)
अधिकाऱ्याला मारहाण; एकाविरुद्ध गुन्हा दाखल
सिंदखेडराजा- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी- येथील तहसील कार्यालयातील प्रभारी नायब तहसीलदार गणेश नागरे यांना कार्यालयात असताना मारहाण झाल्याची घटना बुधवारी दुपारी घडली. याप्रकरणी नागरे यांच्या तक्रारीवरून एकाविरोधात शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी सिंदखेडराजा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
गणेश नागरे हे बुधवारी दुपारी आपल्या कामात असताना हिवरा गडलिंग येथील ज्ञानेश्वर खरात यांनी कार्यालयात येऊन नागरे यांच्याशी आपले काम होत नसल्याबद्दल हुज्जत घालत त्यांना कार्यालयातच मारहाण केली. दरम्यान, अन्य कर्मचाऱ्यांना हा प्रकार कळताच तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी एकत्र येत मारहाण करणाऱ्या खरात यांना तत्काळ अटक करण्याची मागणी केली. सोबतच कामबंद आंदोलनही पुकारले होते.