व्हॅलेंटाईनडेला प्रपोज करून युवतीवर केला लैगिंक अत्याचार
देऊळगाव राजा- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी- व्हॅलेंटाईनडेच्या दिवशी प्रपोज करून उच्चशिक्षित युवतीवर तिच्या इच्छेविरुद्ध अनेकदा बळजबरीने शारीरिक शोषण केल्याची घटना शहरातील एका कॉलनीत उघडकीस आली. या खळबळजनक प्रकाराबाबत पोलीस सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार शहरातील एका उच्चशिक्षित युवतीला १४ फेब्रुवारी २०१९ व्हॅलेंटाईनडेच्या दिवशी आरोपी जितेंद्र शिवाजी साळवे वय ३५ राहणार सिविल कॉलनी याने प्रपोज केले. सदर युवतीस (२) ( बळजबरीने तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक शोषण केले, तिचे अर्ध नग्न फोटो काढून सोशल मीडियावर व्हायरल करायची धमकी देऊन तेव्हापासून २१ सप्टेंबर २०२३ या कालावधीत सिविल कॉलनी आणि औरंगाबाद येथील एका हॉटेलमध्ये वारंवार शारीरिक शोषण केले. तसेच शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी पीडितेच्या फिर्यादीवरून दे. राजा पोलिसांनी ५ मार्च रोजी आरोपी जितेंद्र शिवाजी साळवे याचेविरुध्द अप नं.८९/२०१४ कलम ३७६ एन) ५०४, ५०६ भादंविनुसार गुन्हा दाखल केला.