चाकूने हल्ला करून ४ जणांना जखमी करणाऱ्यास मिळाली जन्मठेपाची शिक्षा
२०१६ मध्ये बुलडाण्यात गरबा उत्सवात सागर टेंभीकरने केला होता हल्ला
बुलढाणा- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी:- नवरात्रीमध्ये दरवर्षी बीसीसीएन-बुलढाणा अर्बनकडून गरबा महोत्सव आयोजित केला जातो. येथील जिजामाता स्टेडियममध्ये गरबा सुरु असताना एका माथेफिरू युवकाने चाकूहल्ला करून चार युवकांना घायाळ केले होते. घटनेत जखमी झालेल्या ५ ही जणांना हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले होते. या प्रकरणी ६ मार्च २०२४ रोजी हल्लेखोर ३४ वर्षीय सागर उर्फ गोलू टेंभीकर याला विशेष न्यायाधीश श्री आर. एन. मेहरे यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. यादरम्यान ७ ऑक्टोबर २०१६ रोजी सायंकाळी ८ वाजेच्या सुमारास आरोपी सागर सारंगधर टेंभीकर खुर्चीवर उभा राहून नाचत होता व इतर लोक त्याला खाली उतर असे म्हणत होते.
तेव्हा सुमित राजभोज व त्याचा भाऊ अमित, जुनागांव बुलढाणा येथील सोनु सुभाष सोळंके आणि इक्बाल नगर मधील शे. मोहसीनशेख हबीब हे चारही जण सागरला खाली उतरून नाच, असे समजावून सांगत असतांना त्याने रागाने त्याच्या खिशातील चाकू काढून चारही जखमींना जीवे मारण्याच्या उददेशाने चाकूने सपासप वार केले. त्यामध्ये सुमित राजभोज, अमित राजभोज, सोनु सोळंके, शेख मोहसीन हे जखमी झाले. त्यानंतर अमित राजभोज व सुमित राजभोज दोघांवर जिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार झाल्यानंतर त्यांना पुढे छ. संभाजीनगर येथील खाजगी हॉस्पीटल येथे उपचार घेतले पोलीसांनी फिर्यादी सुमीत राजमोज याचे जबाबावरून आरोपी सागर टेंभीकर विरोधात पो. स्टे. बुलढाणा येथे कलम ३०७, ३२६, ३२४, भादंवि नुसार गुन्ह दाखल केला होता. सरकार पक्षाने एकुण ९ साक्षीदाराचे पुरावे नोंदविले, त्यामध्ये अमित राजभोज सुमित राजमोज तसेच शेख मोहसीन प्रत्यक्षदर्शी एक साक्षीदार, तसेच बुलढाणा व छ. संभाजीनगर येथील दोन डॉक्टर यांची साथ महत्वाची ठरली. त्यामुळे न्यायालयाने कलम ३०७ व ३२६, ३२४, भा. दं. वि. चे अंतर्गत विद्यमान आरोपीस दोषी ठरवून जन्मठेप शिक्षा सुनावली. सदर प्रकरणात सरकार पक्षातर्फे सहा. सरकारी वकील एस. पी. हिवाळे यांनी अतिशय प्रभावीपणे युक्तीवाद करून सरकारी पक्षाची बाजू वि. न्यायालयासमोर मांडली सरकारी पक्षाच्या वतीने सहा. सरकारी वकील अॅड. एस. पी. हिवाळे यांन काम पाहिले.