३८ वर्षीय महिलेचा विनयभंग आरोपीविरुध्द जलंब पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल
शेगाव- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी- एका ३८ वर्षीय विवाहित महिलेचा इसमाने घरात घुसून विनयभंग केला असल्याची घटना ८ मार्च रोजी दुपारी जलंब येथे घडली याप्रकरणी पोलिसांनी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार याबाबत वृत्त असे की जलंब येथील एक ३८ वर्षीय विवाहित महिला ही गावामध्ये भागवत सप्ताह ऐकण्यासाठी गेली होती सदर महिला भागवत संपल्यानंतर दुपारच्या सुमारास घरी परत आली असता गावातीलच घरासमोर राहात असलेल्या रितेश सुभाष चौधरी या इसमाने महिलेला म्हटले की बाई फराळाचे झाले का -असे म्हणून घरात प्रवेश केला व म्हणाला की तुझे पती व मुले कुठे गेले आहेत. मी त्याला सांगितले की माझे पती व मुले हे मुक्ताबाई येथे गेले आहेत असे सांगितले असता आरोपी रितेश चौधरी यांने माझा वाईट उद्देशाने माझे हात धरून पलंगावर ओढले व माझा विनयभंग केला तसेच हे जर तू कोणाला सांगितले तर तुला जीवाने मारून टाकेल अशी धमकी सुद्धा आरोपी याने महिलेला दिली.याप्रकरणी घटनेची तक्रार सदर महिलेने जलंब पोस्टेला दिली यावरून पोलिसांनी आरोपी रितेश सुभाष चौधरी यांच्याविरुद्ध अप.न. ६३/२०२४ कलम ४५२, ३५४, ३५४ अ,५०६ भादवी अन्वय गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ठाणेदार अमोल बारापात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेका नन्हेखा तडवी हे करित आहे.