शेंबा येथील एटीएम फोडले १ ३ लाखाचा मुद्देमाल लंपास
मोताळा – आपलं बुलढाणा जिल्हा बातमी- नांदुरा तालुक्यातील शेंबा येथील बँक ऑफ महाराष्ट्र बँकेचे एटीएम फोडून त्यातील १३ लक्ष २२ हजाराची रोख लंपास केल्याची घटना १० मार्च रोजी सकाळी उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली. चोरट्यांनी सिसिटीव्ही मशीनवर काळा स्प्रे मारून मिशन फत्ते केले आहे.चोरटे चोरी कशाप्रकारे करतील याचा नेम राहिला नाही. चोरट्यानी आपले नेटवर्क सक्रीय करीत आपला मोर्चा नांदुरा तालुक्यातील शेंबा येथील बँक ऑफ महाराष्ट्र बँकेच्या एटीएमवर चोरट्यांची चोरी करण्याची पध्दत वेगळीच होती. त्यांनी प्रथम एटीएम मशीनमध्ये प्रवेश करून रूमधील सिसिटीव्ही कॅमेऱ्यावर काळा रंगाचा स्प्रे मारून एटीएम मशीनचा दरवाजा ग्यास कटरने कापून एटीएम मधील रक्कम लुटून नेली. चोरटे काळ्या गाडीतून आल्याचे सीसीटीव्हीत कैद झाले आहे.
बँक मॅनेजर पवनकुमार कुरील यांच्या फिर्यादवरून बोराखेडी पोलिसांनी दोन अनोळखी चोरट्यांवर भांदवीचे कलम ४६१, ३८०, ४२७, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.