खुमगाव येथे शेतकऱ्याची रेल्वेगाडीच्या खाली येऊनआत्महत्या
नांदुरा :- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी- तालुक्यातील खुमगाव येथे एक कर्जबाजारी शेतकऱ्याने रेल्वेगाडीच्या इंजिनसमोर येऊन आत्महत्या केल्याची घटना ९ मार्च रोजी उघडकीस आली.खुमगाव बुर्ती स्टेशन मास्टर यांनी शेगाव येथील लोहमार्ग पोलिस अंमलदार गजानन मेटांगे यांना आत्महत्येची माहिती दिली. मुकेश शंकरराव काळे (४६) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. कर्जबाजारीपणामुळे त्यांनी आत्महत्या केल्याचे नातेवाइकांनी सांगितले. मृतदेह शवविच्छेदनाकरिता रुग्णवाहिकेने सरकारी दवाखाना नांदुरा येथे आणण्यात आला. मुकेश हा घरातील कर्ता पुरुष असून, त्यांच्यामागे पत्नी, दोन मुली व एक मुलगा असा परिवार आहे.मुकेश शेतकरी असून, कर्जबाजारी होता. त्याच नैराश्यातून त्याने जीवन संपविल्याचे नातेवाइकांनी सांगितले. पुढील तपास लोहमार्ग पोलिस स्टेशनचे पोलिस अंमलदार पांडुरंग वसू करीत आहे. कारवाईदरम्यान हवालदार झनके, खुमगाव येथील माजी सरपंच रोहित सोनोने, गजानन वावगे, किशोर गई, बाबूराव काळे यांनी मदत केली.