युवा उद्योजक डॉ.अर्चित हिरोळे यांना ‘मुकनायक बुलढाणा’ पुरस्कार प्रदान
बुलढाणा :- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी- जिल्ह्यातील यशस्वी युवा उद्योजक व समाजसेवी असलेले डॉ. अर्चित अमोल हिरोळे यांना , शहरात ९ मार्च रोजी झालेल्या जागतिक स्तरावरील धम्म परिषद आणि बिझनेस एक्स्पो च्या पावन सोहळ्यात मुकनायक बुलढाणा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. उद्योग क्षेत्रअंतर्गत डॉ. अर्चित हिरोळे यांना सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बद्दल सदर पुरस्कार देण्यात येत आहे. बुलढाणा जिल्ह्यात शिक्षण क्षेत्रात आपला अप्रतिम ठसा उमटविलेले माजी शिक्षणाधिकारी स्व. नामदेवराव हरिभाऊ हिरोळे यांचे नातू व नामांकित उद्योजक अमोल नामदेवराव हिरोळे यांचे ते चिरंजीव आहे. मितभाषी व शांत स्वभावाचे
असलेले डॉ. अर्चित अमोल हिरोळे हे राष्ट्रीय एकात्मतेची प्रतीक बुध्दविहार गारडगाव या संस्थेचे उपाध्यक्ष आहेत औरंगाबाद येथून एमजीएम या वैद्यकीय विद्यालयातून त्यांनी वैद्यकिय शिक्षण प्राप्त केलेले आहे.
डॉ. अर्चित अमोल हिरोळे यांचे बुलढाणा येथे जयस्तंभ चौकात हिरोळे पेट्रेलियम पेट्रोल पंप असून हिरोळे ईण्डेन गॅस एजन्सीच्या माध्यमातून ते बुलढाणा शहरात पेट्रोल डिझेल व गॅस ची निरंतर निर्विवाद सेवा पुरवीत असतात. तसेच समृद्धी महामार्गावरील मांडावा ता. लोणार येथे त्यांचा दुसरा पेट्रोल पंप आहे आपल्या या व्यवसायाचा माध्यमातून त्यांनी सर्वच समाजातील कित्येक युवांना रोजगार दिला असून जवळपास दीडशे कुटुंबाचे भरणपोषण आज त्यांच्या माध्यमातून होत आहे. कोविड च्या काळात त्यांनी कित्येक गरजू कुटुंबाना स्वतः अन्न पुरवठा घरोघरी जाऊन केला आहे याकाळात अनेक गरजू कुटुंबाना आर्थिक व वैद्यकीय मदत केलेली आहे. गरजू गरीब कुटुंब असलेल्या भागात वैद्यकीय सेवा देत असतांना ते स्वतः सुद्धा कोविड ग्रस्त झाले होते परंतु या तुन सावरून व कोविड वर मात करून परत आपली सेवा देऊन त्यांनी आपले सामाजिक कर्तव्य न डगमगता पार पाडले. कोविड च्या काळात बेवारस मृतदेहांना अंतिम संस्कार करण्यापासून ते कोविडच्या काळात मृत झालेल्या सर्वं मृतदेहांना अंतिम संस्कार करण्याकरिता मोफत डिझेल पुरवठा केलेला आहे. ते आपल्या सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर राहत असून अनेक गरजूना आर्थिक व सामाजिक मदत करीत असतात बुलढाणा शहरात होणाऱ्या सर्वच सामाजिक उपक्रमात से हिरानीने सहभागी होत असतात. अश्या उदयोग क्षेत्रात व सामाजिक क्षेत्रात ठसा उमटविलेल्या व्यक्तीस मुकनायक बुलढाणा पुरस्कार जाहीर होणे म्हणजे त्यांच्या उदयोग क्षेत्रात व सामाजिक क्षेत्रात केलेल्या कामाची पावतीच आहे.अंतरराष्ट्रीय स्तराचे धम्मगुरु, बौद्ध समाजातील गणमान्य आणि अनेक प्रतिष्ठीतांच्या उपस्थितीत त्यांना मूकनायक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.