राष्ट्रमाता जिजाऊ महिला अर्बन शाखा डोंगरखंडाळा भव्य उदघाटन सोहळा दिग्ग्जांच्या उपस्थितीत संपन्न
बुलढाणा-आपलं बुलढाणा जिल्हा बातमी- दि 08/03/2024 रोजी महाशिवरात्र तथा जागतिक महिला दिनाच्या मुहूर्तावर राष्ट्रमाता जिजाऊ महिला अर्बन च्या दुसऱ्या नवीन डोंगरखंडाळा ता जि बुलडाणा शाखेचा उदघाटन सोहळा कार्यक्रमाचे अध्यक्ष बुलडाणा अर्बनचे सर्वे सर्वा आदरणीय श्री राधेश्याम चांडक भाईजी ,तथा उदघाटक राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विधानपरिषद आमदार अमोल मिटकरी ,बुलडाणा विधानसभेचे आमदार संजय गायकवाड ,विधानपरिषद(पदवीधर )आमदार धीरज लिंगाडे ,चिखली विधानसभेच्या आमदार श्वेताताई महाले ,माजी आमदार बुलडाणा विधानसभा हर्षवर्धन सपकाळ ,शेतकरी नेते रवीकांत तुपकर ,ऍड.विजय सावळे (अध्यक्ष बार असोशियन बुलडाणा ),श्री शेषराव सावळे (दलितमित्र नेते ) दत्ता काकस (नेते राष्ट्रीय काँग्रेस बुलडाणा ), रामभाऊ बारोटे (अध्यक्ष विवेकानंद पथसंस्था बुलडाणा )यांसोबत अनेक आदरणीय तोलामोलाच्या मान्यवरांच्या आणि गावकरी बंधू भगिनींच्या उपस्थिती मोठ्या उत्साहात पार पडला सूत्रसंचालन रणजितसिंग राजपूत यांनी केले
.विश्वास ..सहकार्य स्वावलंबन या त्री सुत्रीवर कार्य करत संस्थेने 25 करोड च्या वर आज ठेवी प्राप्त करत ग्राहकांचा विश्वास जपलाय .यावेळी मान्यवरांनी संस्थेच्या अध्यक्षा प्रा सौ अनुजा अनिल सावळे तसेच संस्थेचे संचालक मंडळ कर्मचारी यांचे कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.संस्थेच्या अध्यक्षा प्रा सौ अनुजा अनिल सावळे अनेक वर्षांपासून शैक्षणिक ,सामाजिक ,राजकीय क्षेत्रात कार्यरत असून त्यांच्या कार्याचा वेगळा ठसा त्यांनी मोठ्या निपुनपणे उमटवला असून खऱ्या अर्थाने समाजपयोगी महिला ,युवा ,विद्यार्थी ,शेतकरी ,गरजू यांसाठी विविध योजना ,सवलती ,उपक्रम राबवत सहकार जननी माँ जिजाऊंचे विचार आचार कार्य त्या पुढे नेत असून त्यांना सहकाराचं बाळकडू आदरणीय जिल्ह्याचे नेते मार्गदर्शक आमदार डॉ राजेंद्र शिंगणे साहेब आणि प्रोत्साहन हे पालकमंत्री तसेच राज्य सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी संस्थेला दिलेल्या शुभेच्छा भेटीने नक्कीच मिळाले असे कौतुक आमदार अमोल मिटकरी यांनी केले.
जिल्ह्याचे सहकार तज्ञ् आदरणीय राधेश्यामजी चांडक भाईजी यांनी येणाऱ्या काळात अर्थकारणात पथसंस्था किती आवश्यक भूमिका बजावणार आणि राष्ट्रमाता जिजाऊ महिला अर्बन त्यांच्या अभ्यासू अध्यक्ष आणि त्यांचे यजमान श्री अनिल सावळे यांच्या मार्गर्शनात नक्कीच जबाबदार अर्थकारण करतील अशी शाश्वती भाईजींनी दिली ….
.राष्ट्रमाता जिजाऊ महिला अर्बन संस्थेमार्फत नक्कीच आर्थिक बळ गरजुंना मिळेल आणि माझ्या भगिनी संस्थेच्या अध्यक्ष अनुजाताई सावळे ह्यांच्या विश्वास ..सहकार्य ..स्वावलंबन या त्री सुत्रीवर नक्क्कीच सहकारात गगनभरारी घेताय असे कौतुक आमदार संजय गायकवाड यांनी केले. महिला सबलीकरणाचा ध्यास धरत व्यावसायिक महिला आणि युवा तसेच येणाऱ्या पिढीला आणि शेतकऱ्यांना संस्थेच्या सहकार्यातून बळ मिळेल अशी ग्वाही आणि शुभेच्छा आमदार श्वेताताई महाले यांनी दिल्या .
सर्व मान्यवर यांनी व्यस्त वेळेतून उदघाटनास उपस्थिती दर्शवली तसेच मनातून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या याबद्दल खूप आभारी आहे.